एक्स्प्रेसवर प्रशासन मेहरबान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:35 IST2021-08-17T04:35:44+5:302021-08-17T04:35:44+5:30
जालना : कोरोनाचे कारण देत मध्यंतरी वर्षभर रेल्वेसेवा बंद होती. परंतु, आता रेल्वे प्रशासनाने जवळपास सर्व एक्स्प्रेस सुरू केले ...

एक्स्प्रेसवर प्रशासन मेहरबान
जालना : कोरोनाचे कारण देत मध्यंतरी वर्षभर रेल्वेसेवा बंद होती. परंतु, आता रेल्वे प्रशासनाने जवळपास सर्व एक्स्प्रेस सुरू केले आहेत. परंतु, पॅसेंजर ही सर्व सामान्यांसाठीची रेल्वेसेवा अद्यापही सुरू झालेली नाही.
ही सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रवासी संघटनांसह अन्य नागरिकांनी केली आहे. परंतु, अद्यापही याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष दिले नाही. आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीच लक्ष देण्याची गरज आहे.
बंद असलेल्या
पॅसेंजर रेल्वे
जालना-नगरसोल, मनमाड-काचीगुडा, दौंड-निजामाबाद, नांदेड-दौलताबाद, हैदराबाद-औरंगाबाद या पॅसेंजर गेल्या दीड वर्षापासून कोराेनाचे कारण देत बंद आहेत. त्या पूर्ववत सुरू करण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे.
स्टेशन मास्तर म्हणतात
एक्स्प्रेससोबतच पॅसेंजर सुरू झाल्यास रेल्वेचे उत्पन्न वाढून प्रवाशांना चांगली सेवा देता येईल, परंतु, हा निर्णय अत्यंत वरिष्ठ पातळीवरून होत असल्याने याबाबत आम्हीही प्रवाशांप्रमाणेच प्रतीक्षेत आहोत.
- के. ओ. राम
सुरू असलेल्या एक्स्प्रेस
नंदीग्राम ते मुंबई, निजामाबाद ते मुंबई (देवगिरी एक्स्प्रेस), जालना ते विटी स्टेशन (जनशताब्दी एक्स्प्रेस), धर्माबाद ते मनमाड (मराठवाडा एक्स्प्रेस), नांदेड ते मुंबई (तपोवन एक्स्प्रेस), मनमाड ते काचीगुडा (अजिंठा एक्स्प्रेस), या गाड्या सुरू आहेत. परंतु, येथीही ज्यांचे आरक्षण आहे. अशाच प्रवाशांना मुभा आहे.
सर्वच एक्स्प्रेस सुरू
कोरोनाकाळात जवळपास सर्व रेल्वे सेवा ठप्प होती. हळूहळू रेल्वे प्रशासनाने हैदराबाद ते मुंबई या दरम्यान असलेल्या सर्व एक्स्प्रेस नव्याने सुरू केल्या आहेत.
रेल्वेचा ‘स्पेशल’ प्रवास परवडेना
एकीकडे सर्व सामान्यांसाठीच्या पॅसेजर रेल्वे बंद आहेत. त्यामुळे सर्वच एक्स्प्रेसमध्ये आरक्षण केल्याशिवाय प्रवास करण्यास मुभा नाही. हे आरक्षण सर्व सामान्यांच्या खिशाला परवडणारे नाही. जवळपास अडीच ते तीन पट अधिकची रक्कम मोजून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. ही बाब परवडणारी नाही.
- जनार्दन खरात, प्रवासी
एक्स्प्रेस रेल्वेमध्ये आजही वातानुकूलित डब्यामध्ये आरक्षण मिळताना अधिकचे पैसे मोजावे लागत आहे. जे की, गेल्या वर्षीच्या तुलनेत थेट ५०० ते ७०० रुपयांनी महागले आहेत. हे दर कमी करावे, अशी मागणी प्रवासी संघटनेने दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे केली आहे.
- प्रशांत मोरे, प्रवासी