परतूर येथे १५ वर्षीय मुलीचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:19 IST2021-07-12T04:19:27+5:302021-07-12T04:19:27+5:30
परतूर : शहरातील पारधी वाडा येथे राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची घटना ९ जुलै रोजी ...

परतूर येथे १५ वर्षीय मुलीचे अपहरण
परतूर : शहरातील पारधी वाडा येथे राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची घटना ९ जुलै रोजी घडली. याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरून रविवारी परतूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील पारधी वाडा येथे राहणारी १५ वर्षीय मुलगी सकाळी आठच्या सुमारास किराणा दुकानावर सामान आणण्यासाठी गेले होती. त्यानंतर ती परतली नाही. आई व नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. परंतु, ती मिळून आली नाही. आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
२१ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता
परतूर : परतूर शहरातील मोंढा भागात लड्डा कॉलनीतील एक २१ वर्षीय विवाहित महिला कोणाला न सांगता शनिवारी सकाळी घरातून निघून गेली. महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून परतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.