निवडणूक काळात शांतता राखा- जायभाये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:25 IST2021-01-09T04:25:27+5:302021-01-09T04:25:27+5:30
पारध पोलीस ठाण्याच्या वतीने आगामी ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात पोलीस ठाणे आवारात पॅनलप्रमुख, उमेदवार, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांच्यासाठी शुक्रवारी शांतता ...

निवडणूक काळात शांतता राखा- जायभाये
पारध पोलीस ठाण्याच्या वतीने आगामी ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात पोलीस ठाणे आवारात पॅनलप्रमुख, उमेदवार, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांच्यासाठी शुक्रवारी शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी पो. नि. जायभाये म्हणाले, निवडणूक संदर्भातील कायदे अत्यंत कठोर आहेत. या काळात विनाकारण उपद्रव करून कायदा भंग करण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांना योग्य ती कार्यवाही करावी लागेल. यासाठी निवडणूक शांततेत कशी पार पाडता येईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असेही जायभाये म्हणाले. बैठकीस शिवसेना जिल्हा उपप्रमुख मनीष श्रीवास्तव, माजी सभापती परमेश्वर पाटील, माजी सरपंच गणेश लोखंडे, संदीप काटोले, शेख रफीक, शरद देशमुख, शाम देशमुख, श्रीराम लोखंडे, गणेश तेलंग्रे, प्रदीप सरडे, पो. कॉ. सुरेश पडोळ आदींची उपस्थिती होती.
फोटो ओळ : पारध पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना पो. नि. रमेश जायभाये.