केदारेश्वर यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:30 IST2021-03-10T04:30:48+5:302021-03-10T04:30:48+5:30

वीजपुरवठा विस्कळीत अंबड : ग्रामीण भागातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतातील कामांवर मोठा परिणाम होत आहे. ...

Kedareshwar Yatra canceled | केदारेश्वर यात्रा रद्द

केदारेश्वर यात्रा रद्द

वीजपुरवठा विस्कळीत

अंबड : ग्रामीण भागातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतातील कामांवर मोठा परिणाम होत आहे. शिवाय व्यावसायिक हैराण झाले आहेत. महावितरणने सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.

अभिवादन कार्यक्रम

वरूड : जाफराबाद तालुक्यातील वरूड बु. येथे नाभिक समाज बांधवांच्या वतीने संत शिरोमणी सेना महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमास सरपंच संतोष ठाकरे, शांतीनाथ वाघमारे व इतरांची उपस्थिती होती.

नेत्र तपासणी शिबिर

भाेकरदन : तालुक्यातील कोदोली येथे आयोजित नेत्र तपासणी शिबिरात १०० जणांची नेत्रतपासणी करण्यात आली. शिबिरात ४० जणांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच प्रकाश गिरणारे, माधवराव पाटील व इतरांची उपस्थिती होती.

एटीएम मशीन कुलूपबंद

कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील श्रीक्षेत्र जांब समर्थ येथील कॅनरा बँकेची एटीएम मशीन कुलूपबंद आहे. त्यामुळे परिसरातील १७ गावातील ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

Web Title: Kedareshwar Yatra canceled