केदारखेड्याचा तलाठी तडकाफडकी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:38 IST2017-12-07T00:38:24+5:302017-12-07T00:38:29+5:30
अवैध वाळूसाठा जप्त केल्यानंतर उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी यांनी केदारखेडा येथील तलाठी राम धनेश यांना तडकाफडकी निलंबित केले.

केदारखेड्याचा तलाठी तडकाफडकी निलंबित
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : अवैध वाळूसाठा जप्त केल्यानंतर उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी यांनी केदारखेडा येथील तलाठी राम धनेश यांना तडकाफडकी निलंबित केले. तालुक्यातील केदारखेडा, पिंपळगाव सुळ, देऊळगाव तांड, वालसा खालसा या ठिकाणी तहसीलदारांनी टाकलेल्या छाप्यात कोट्यवधी रूपयांचा अवैध वाळूसाठा जप्त करण्यात आला होता.
तहसीलदार योगिता कोल्हे यांनी केदारखेडजवळील पिंपळगाव सूळ परिसरातील गिरजा नदीच्या पात्रात अचानक छापा मारून तब्बल २ कोटी ८० लाख रूपयांचा अवैध वाळु साठा जप्त केला होता. तसेच वाळु साठ्याची चोरी होऊ नये म्हणुन या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात २४ तास बैठ्या पथकाची नेमणूक केली आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध वाळुचा साठा असताना तलाठ्याने तहसीलदारांना माहिती दिली नाही.