अध्यक्षपदी कांबळे, सचिवपदी बेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:47 IST2021-02-23T04:47:27+5:302021-02-23T04:47:27+5:30
माहोरा गावामध्ये अंधाराचे साम्राज्य माहोरा : जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील सिंगल फेजचे पाच गट्टू जळले आहेत. त्यामुळे अर्ध्याहून अधिक ...

अध्यक्षपदी कांबळे, सचिवपदी बेग
माहोरा गावामध्ये अंधाराचे साम्राज्य
माहोरा : जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील सिंगल फेजचे पाच गट्टू जळले आहेत. त्यामुळे अर्ध्याहून अधिक गावात अंधार पसरला असून, नागरिकांना एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संबंधितांनी तातडीने येथील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्राहकांमधून केली जात आहे.
अध्यक्षपदी तौर तर उपाध्यक्षपदी ढेरे
घनसावंगी : मेडिकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष साईनाथ पवार यांच्या अध्यक्षतेखाली घनसावंगीत बैठक पार पडली. या बैठकीत घनसावंगी संघटनेच्या अध्यक्षपदी सुनील तौर तर उपाध्यक्षपदी बळीराम ढेरे यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुनील शेळके, जितेंद्र लखोटीया, संतोष सारडा, देशमुख यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
काणे यांची राज्य क्रिकेट समिती सदस्यपदी निवड
जालना : येथील क्रिकेटचे प्रशिक्षक राजू काणे यांची राज्य क्रिकेट संघटनेच्या ज्युनिअर निवड समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे. आजवर काणे यांनी विविध वयोगटातील निवड समितीचे सदस्य, १९ वर्षाखालील निवड समितीचे अध्यक्ष, राज्य संघाचे व्यवस्थापक म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या निवडीचे स्वागत होत आहे.