कैलास गोरंट्याल, सुरेश जेथलियांना काँग्रेसची उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 01:25 AM2019-10-02T01:25:05+5:302019-10-02T01:25:38+5:30

जालना विधानसभा मतदार संघातून कैलास गोरंट्याल तर परतूरमधून सुरेशकुमार जेथलिया यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.

Kailash Gorantyal, Congress candidate for Suresh Jaithalia | कैलास गोरंट्याल, सुरेश जेथलियांना काँग्रेसची उमेदवारी

कैलास गोरंट्याल, सुरेश जेथलियांना काँग्रेसची उमेदवारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना विधानसभा मतदार संघातून कैलास गोरंट्याल तर परतूरमधून सुरेशकुमार जेथलिया यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दुसऱ्या यादीमध्ये या दोन्ही पदाधिकाऱ्यांना स्थान दिल्याचे जाहीर केले आहे.
मंगळवारी रात्री उशिरा काँग्रेसने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. या उमेदवारीमुळे आता जालन्यात शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या विरोधात कैलास गोरंट्याल तर परतूर मतदार संघात पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्या विरोधात सुरेशकुमार जेथलिया अशी लढत होणार आहे. या निवडीचे काँग्रेसकडून स्वागत होत आहे.
मतदारांनी संधी दिल्यास विकासासाठी कटिबध्द - गोरंट्याल
जालना : राज्यमंत्रीपद मिळालेले असतानाही विद्यमान आमदारांना विकास कामे खेचून आणण्यात अपयश मिळाले आहे. जालना विधानसभा मतदार संघातील मतदारांनी संधी दिली तर मतदार संघाच्या चौफेर विकास करण्याबरोबरच मतदार संघातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली.
गोरंट्याल यांनी सोमवारी जालना विधानसभा मतदार संघातील वरुड येथील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी आनंदराव म्हस्के, बबनराव म्हस्के, आनंदराव शिंदे, उत्तम वाहुळे, सुभाष म्हस्के, पंडित शिंदे, रतन शिंदे, परमेश्वर घुले, भरत झारखंडे, दत्ता म्हस्के, कैलास कव्हळे, गणेश म्हस्के, देविदास क्षीरसागर, दिलीप क्षीरसागर, मल्हारी पठारे, पंढरीनाथ म्हस्के, शिवाजी गायकवाड यांची उपस्थिती होती.
गोरंट्याल म्हणाले, २००९ ते २०१४ या कालावधीत आपण आमदार असताना राज्यशासनाकडे पाठपुरावा करून अनेक विकासाची कामे खेचून आणली होती. जायकवाडी-जालना या पाणीपुरवठा योजनेबरोबरच जिल्हा महिला बाल रूग्णालय आणि इतरही अनेक विकासाची कामे ही आपल्याच कारकिर्दीत झालेली आहेत. विद्यमान आमदार राज्यात सत्तेत असून राज्यमंत्री असताना त्यांनी मतदार संघाचा चेहरा-मोहरा बदलणे अपेक्षित होते. मात्र, विकासाची कामे आणि महत्त्वाचे प्रकल्प जालना मतदार संघात खेचून आणण्यात ते अपयशी ठरले आहेत, अशी टीका देखील गोरंट्याल यांनी केली.
यावेळी अंबादास इंगळे, संतोष गायकवाड, शंकर खंदारे, विनोद म्हस्के, रामू शिंदे, सुरेश घुले, गणेश खंदारे, भरत म्हस्के, लक्ष्मण परळकर, पांडुरंग म्हस्के, योगेश भालेकर, भरत झारकंडे, दीपक म्हस्के, रामेश्वर म्हस्के, अर्जुन म्हस्के, किशोर म्हस्के, समाधान म्हस्के, सागर काटकरे, अविनाश म्हस्के, संदीप शिंदे, अनिल घुले, दीपक म्हस्के, गौतम सातपुते, जगन वाहुळे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Kailash Gorantyal, Congress candidate for Suresh Jaithalia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.