शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

कैलास बोराडे मारहाण प्रकरण, वंचितचा जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 19:23 IST

पीडित कैलास बोराडे यांच्या पत्नीसह वंचित बहुजन आघाडीचे नेते व ओबीसी समाजाचे नेते या मोर्चात सहभागी झाले होते.

जालना : जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील कैलास बोराडे मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करून त्यांना मोक्का लावावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरूवारी ६ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पीडित कैलास बोराडे यांच्या पत्नीसह वंचित बहुजन आघाडीचे नेते व ओबीसी समाजाचे नेते या मोर्चात सहभागी झाले होते.

शहरातील गांधी चमन येथून गुरूवारी दुपारी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रभारी जितेंद्र शिरसाट, वंचित बहुजन आघाडीचे मुख्य संघटक महेश निनाळे, जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे, जिल्हा महासचिव प्रशांत कसबे, जिल्हा कार्याध्यक्ष परमेश्वर खरात, ओबीसी समाजाचे नेते नवनाथ वाघमारे, दीपक बोराडे, रामप्रसाद थोरात, स्नेहा सोनकाटे, प्रभाकर बकले, वंचितच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय लहाने, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रमा होर्शिल आदींच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात पीडित कैलास बोराडे यांच्या पत्नी सुरेखा बोराडे व त्यांचा परिवार ही सहभागी झाला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चाचे रूपांतर नंतर सभेत झाले. यावेळी नवनाथ वाघमारे, दीपक बोऱ्हाडे, जितेंद्र शिरसाट, रामप्रसाद थोरात, डेव्हिड घुमारे यांनी कैलास बोराडे मारहाण प्रकरण हे माणुसकीला काळिमा फासणारे असून महाराष्ट्र राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले असल्याचे हे द्योतक असल्याचे सांगितले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे जालना तालुकाध्यक्ष भानुदास साळवे, ओबीसी समन्वय समितीचे अध्यक्ष सुंदरलाल बगीनवाल, सचिव राजेंद्र वांजुळे, ज्ञानेश्वर मानवतकर, दीपक खाजेकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, ओबीसी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

तर तीव्र आंदोलन करू : घुमारेमहाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या व माणुसकीला काळिमा फासणाऱ्या कैलास बोराडे मारहाण प्रकरणाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रथम वाचा फोडली. आज वंचित बहुजन आघाडीने कैलास बोराडे मारहाण प्रकरणी काढलेला जालना शहरातील मोर्चा हा महाराष्ट्रातील पहिला मोर्चा आहे. केवळ मागासवर्गीय, भटका विमुक्त समाजाच नव्हे तर ओबीसींच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी भक्कमपणे उभी राहिली आहे, हे या प्रकरणावरून स्पष्ट होते. कैलास बोराडे मारहाण प्रकरणातील आरोपींना मोक्का लावण्याची मागणी केली आहे. ती मान्य न झाल्यास वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी दिला.

टॅग्स :JalanaजालनाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी