कदमची न्यायालयात विनंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:47 IST2018-12-19T00:47:03+5:302018-12-19T00:47:18+5:30
अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील गैरव्यवहार प्रकरणी अटक असलेले आ. रमेश कदम यांना मंगळवारी जालना येथील न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते.

कदमची न्यायालयात विनंती
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील गैरव्यवहार प्रकरणी अटक असलेले आ. रमेश कदम यांना मंगळवारी जालना येथील न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते. त्यावेळी सत्र न्यायाधीशांसमोर स्वत: बाजू मांडली. यावेळी त्यांनी मला या खटल्यातून वगळण्याची मागणी केली. या मागणीवर आता ३ जानेवारीला सुनावणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
अण्णा भाऊ साठे विकास महामंडळात बोगस लाभार्थी दाखवून त्यांच्या नावे कर्ज काढण्यासह अन्य लाभ उचलून महामंडळाचे मोठे आर्थिक नुसान केले. यावरून आ. रमेश कदम यांच्या विरूध्द महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत. जालना जिल्ह्यातही २०१४ ते १०१५ या वर्षभरात महामंडळात जवळपास आठ कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे पुढे आले आहे. मंगळवारी आ. कदम यांना सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्या न्यायालयात हजर केले होते. कदम हे सध्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात आहेत.