जयंती बातमी जोड....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:21 AM2021-01-13T05:21:31+5:302021-01-13T05:21:31+5:30

जाफराबाद : राजमाता जिजाऊंचे विचार हे क्रांतिकारी असून, जिजाऊंच्या विचारांच्या कृतीतून आचरण करावे, असे प्रतिपादन सुरेखा लहाने यांनी ...

Jubilee News Add .... | जयंती बातमी जोड....

जयंती बातमी जोड....

Next

जाफराबाद : राजमाता जिजाऊंचे विचार हे क्रांतिकारी असून, जिजाऊंच्या विचारांच्या कृतीतून आचरण करावे, असे प्रतिपादन सुरेखा लहाने यांनी केले.

शहरातील राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल येथे जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने गौरव मातृशक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमात तालुक्यातील सुरेखा लहाने, मीरा निकम, जयश्री शेळके, डॉ. सुचेता कड, शालिनी बकाल, संध्या लोखंडे, शारदा दुनगहु, मनीषा सरोदे, वैशाली गाढे या गौरवशाली महिलांचा सत्कार मराठा सेवा संघाच्यावतीने करण्यात आला. अ‍ॅड. विकास जाधव यांनी यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या जीवन कार्यावर माहिती दिली. जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून सुरेखा लहाने व संजय लहाने यांनी जालना येथे मराठा सेवा संघाच्यावतीने मुलींच्या वसतिगृहासाठी ११ हजार रुपयांची मदत केली. यावेळी संजय लहाने, ज्ञानेश्वर निकम, निवृत्ती दिवटे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष विकास जाधव, प्रभू गाढे, उमेश दुनगहु, कैलास लोखंडे, समाधान सरोदे, डॉ. शेषराव पालकर, प्रा. के. एस. पाटील, विष्णू शिंदे, डॉ. गजानन पडघन, ज्ञानेश्वर पाबळे, सतीश राऊत, शरद सिरसाट आदींची उपस्थिती होती. कैलास लोखंडे यांनी आभार मानले.

फोटो आहे

ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रम

देळेगव्हाण : येथील ग्रामपंचायत कार्यालयात प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी गणेश दानवे, जिल्हा परिषदेचे वरिष्ठ सहायक लेखा अधिकारी ज्ञानेश्वर देठे, ज्ञानेश्वर शिंदे, विलास पोटे, दीपक कव्हले, सचिन निलक, रामदास गाढवे, सतीश बनकर, योगेश घाडगे, विष्णू बनकर, बद्री कापसे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Jubilee News Add ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.