जिजाऊंच्या संस्काराची आजच्या काळाला गरज- घोगरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:41 IST2021-02-27T04:41:24+5:302021-02-27T04:41:24+5:30
जालना : स्त्रीला निर्भयपणे जगात वावरायचे असेल, तिला आपले अस्तित्व सिद्ध करायचे असेल, प्रत्येक क्षेत्रात प्रगती करायची असेल तर ...

जिजाऊंच्या संस्काराची आजच्या काळाला गरज- घोगरे
जालना : स्त्रीला निर्भयपणे जगात वावरायचे असेल, तिला आपले अस्तित्व सिद्ध करायचे असेल, प्रत्येक क्षेत्रात प्रगती करायची असेल तर राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि विचार आत्मसात करावे लागतील. जो समाज इतिहासाचे स्मरण ठेवतो, तोच इतिहास घडवतो, असे प्रतिपादन शिवशाहीर अरविंद घोगरे यांनी घनसावंगी तालुक्यातील दाई अंतरवाली येथे संभाजी ब्रिगेड जालना यांच्या वतीने नुकतेच व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे कोषाध्यक्ष संतोष गाजरे, प्रदेश संघटक सुदर्शन तारक, तालुकाध्यक्ष कारभारी सपाटे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष डॉ. सचिन घुगे, मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर उढाण, जिल्हाध्यक्ष विजय वाडेकर, संतोष जेधे, राधेशाम पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना घोगरे म्हणाले की, सध्याचा युवक हा व्यसनाच्या आहारी गेला आहे. त्यातच सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. यामुळे युवक आपल्या ध्येयाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे युवकांनी व्यसनाच्या आहारी न जात आपल्या ध्येयाकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. तर सुदर्शन तारक यांनी पक्षाची चाकरी केल्यापेक्षा स्वताच्या कष्टाची भाकरी कमवायचा विचार करा, असे मत व्यक्त केले.
यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विकास काळे, केशव आर्दड, गायक किशोर दिवटे, योगेश गायके, व्यावसायिक अविनाश भुतेकर, यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष कैलास खांडेभराड, सरपंच बाळासाहेब बरसाले, भगवान यादव, विनोद बरसाले, गजानन काळे, प्रदीप गंधाखे, पांडुरंग काळे, नितीन बरसाले यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर उढाण यांनी केले.