शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

जरांगे यांची मुख्यमंत्री शिंदेंशी मोबाईलवर चर्चा

By विजय मुंडे  | Updated: September 12, 2023 23:51 IST

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने ही चर्चा झाली असून, जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकमेकांना थेट बोलणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मंगळवारी रात्री मोबाईलवर चर्चा झाली. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने ही चर्चा झाली असून, जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकमेकांना थेट बोलणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी रात्री अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची भेट घेवून चर्चा केली. यावेळी मंत्री संदीपान भुमरे, आ. राजेश टोपे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आ. नारायण कुचे उपस्थित होते. उपस्थित पदाधिकारी आणि जरांगे यांच्यात जवळपास दोन ते अडीच तास चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मनोज जरांगे या दोघांमध्ये मोबाईलवर चर्चा झाली. झालेली चर्चा ही मराठा आरक्षणावर शासन कसे सकारात्मक आहे यावर झाली असावी. समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक असल्याचे सामंत यांनी सांगितले. जरांगे यांनी त्यांची भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडली आहे. त्यांचा काही निरोप असेल तर मी त्यांना देईन. त्यांचे उपोषण सुटले पाहिजे, त्यांची प्रकृती चांगली राहिली पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठीच ३० दिवसांचा कालावधी मागितला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी आम्ही सर्वजण राजकारण बाजूला ठेवून काम करीत असल्याचेही ते म्हणाले.चौकट

प्रत्यक्ष यावे अशी मागणीआरक्षणावर, तब्येतीवर चर्चा आमची चर्चा झाली. पहिल्या समितीने काम केले नाही. पहिले तीन महिने वाया गेले. एक महिन्याचा वेळ आम्ही दिला आहे. आता प्रत्यक्ष यावे म्हणजे आता आम्ही आमरण उपोषण सोडून साखळी उपोषण करू, असे मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्या सकाळी सांगतो, असा निरोप दिल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणreservationआरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदेUday Samantउदय सामंत