जालन्यात खड्ड्यांचा वाढदिवस; रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांचे अनोखे आंदोलन

By दिपक ढोले  | Updated: July 28, 2023 18:59 IST2023-07-28T18:58:55+5:302023-07-28T18:59:06+5:30

जालना शहरातील जिल्हाधिकारी निवासस्थान आणि सिरसवाडी रोडवर मोठमोठे खड्डे पडले आहेत.

Jalnaya Pits Birthday; A unique movement of citizens for road repair | जालन्यात खड्ड्यांचा वाढदिवस; रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांचे अनोखे आंदोलन

जालन्यात खड्ड्यांचा वाढदिवस; रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांचे अनोखे आंदोलन

जालना : सिरसवाडी रोडवरील खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी स्वराज्य संघटनेच्या वतीने शुक्रवारी केक कापून खड्ड्यांचा वाढदिवस साजरी करून प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

जालना शहरातील जिल्हाधिकारी निवासस्थान आणि सिरसवाडी रोडवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शुक्रवारी स्वराज्य संघटनेच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्यावरील खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. केक कापून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. तत्काळ खड्डे बुजवले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला. यावेळी स्वराज्य सेनेचे जिल्हाप्रमुख विश्वंभर तिरुखे, कोर कोअर कमिटीचे सदस्य पंकज जऱ्हाड, युवक जिल्हाप्रमुख रोहित देशमुख, किरण चौधरी यांची उपस्थिती होती.

Web Title: Jalnaya Pits Birthday; A unique movement of citizens for road repair

टॅग्स :Jalanaजालना