जालना - नजीकपांगरी रस्त्याची लागली वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:43 IST2021-02-26T04:43:52+5:302021-02-26T04:43:52+5:30
जालना : जालना तालुक्याला जोडणाऱ्या निधोना, मांडवा, घाणेवाडी, नजीकपांगरी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्याची पूर्णत: ...

जालना - नजीकपांगरी रस्त्याची लागली वाट
जालना : जालना तालुक्याला जोडणाऱ्या निधोना, मांडवा, घाणेवाडी, नजीकपांगरी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्याची पूर्णत: वाट लागली आहे. खड्ड्यांमुळे प्रवाशांना मणक्याच्या आजारासह अपघाताचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याचे तातडीने काम करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निधोना, मांडवा, घाणेवाडी, पांगरी, उज्जैनपुरी व भराडखेडा या गावांतून दररोज शेतकऱ्यांसह विद्यार्थी ये-जा करतात. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. परंतु, रस्त्यावर ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावरून वाहने चालविणे अवघड झाले आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी अनेकवेळा करण्यात आली. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
निधोना येथून समृद्धी महामार्ग गेला आहे. या समृध्दी महामार्गाचे काम सुरू असताना ओव्हरलोड गाड्या रस्त्याने गेल्याने रस्त्याची वाट लागली आहे. जालना शहराला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे युवा शेतकरी युवराज डासाळा यांनी सांगितले. खड्ड्यांमुळे रस्त्यावर दररोज अपघात होत आहेत. यामुळे जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागतात. याबाबत संबंधित विभागाकडे अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या. परंतु, याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची खंत राहुल आदमाने, दीपक आदमाने, सचिन देशमुख, गोरकआप्पा शाहापूरकर, युवराज डासाळ, नितीन देशमुख, शुभास बोरडे यांनी व्यक्त केली.
मागणी मान्य न केल्यास आंदोलन
या रस्त्याचे काम तातडीने करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवराज डासाळ, गजानन वाळके, रमेश कावले, शेख आलिम, सचिन देशमुख, निर्गुण वाढेकर, गणेश सोनवणे, अंकुश खडके, सुभाष बोरुडे यांनी दिला आहे.
===Photopath===
250221\25jan_11_25022021_15.jpg
===Caption===
जालना ते नजिक पांगरी रस्त्याची अशी दुरवस्था झालीआहे.