जालना : तक्रारदारावर दाखल असलेल्या ॲट्रोसिटीच्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्यासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना २ लाख रूपयांची लाच स्वीकारताना पुुणे येथील लाच लुचपत विभागाच्या पथकाने गुरूवारी ताब्यात घेतले. सुधीर खिरडकर (रा. ऋषीपार्क, जालना), संतोष निरंजन अंभोरे (४५, रा. जालना), विठ्ठल पुंजाराम खार्डे (रा. कडवंचीवाडी ता.जि. जालना) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
तक्रारदार हा जालना तालुक्यातील कडवंची येथील रहिवासी आहे. त्याच्यावर कदीम जालना पोलीस ठाण्यात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी जालन्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर यांनी ५ लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती तीन लाख रूपये देण्याचे ठरले. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने पुणे येथील लाच लुचपत विभागास संपर्क केला. लाच लुचपत विभागाच्या पथकाने गुरुवारी जालना येथून येऊन सापळा रचला. पोलीस कर्मचाऱ्यांना दोन लाख रूपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पुणे येथील लाच लुचपत विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वर्षांराणी पाटील, पोनि. सुनील क्षिरसागर, नवनाथ वाळके, किरण चिमटे, दिनेश माने यांनी केली.