आंतरराज्यीय टोळीचा म्होरक्या जालना पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:57 IST2021-02-18T04:57:32+5:302021-02-18T04:57:32+5:30
जालना : राज्याच्या विविध भागात दिवसा घरफोडी करून लाखोचा ऐवज लंपास करणाऱ्या मध्यप्रदेशातील आंतरराज्यीय टोळीच्या म्होरक्याला जालना गुन्हे शाखेने ...

आंतरराज्यीय टोळीचा म्होरक्या जालना पोलिसांच्या ताब्यात
जालना : राज्याच्या विविध भागात दिवसा घरफोडी करून लाखोचा ऐवज लंपास करणाऱ्या मध्यप्रदेशातील आंतरराज्यीय टोळीच्या म्होरक्याला जालना गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. ही कारवाई १३ फेब्रुवारी रोजी करण्यात आली असून, त्याच्यावर राज्यातील विविध पोलीस ठाण्यात १२ गुन्हे दाखल आल्याची माहिती पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी दिली.
जालना शहरातील गोपीकिशननगर भागातील घरफोडी प्रकरणातील आरोपींचा शोध जालना गुन्हे शाखेचे पथक घेत होते. या चोरीमध्ये मध्यप्रदेशातील इंदोर येथील आरोपींचा हात असल्याची माहिती पोनि. भुजंग यांना मिळाली होती. त्या माहितीनुसार पोनि. भुजंग, पोउपनि दुर्गेश राजपूत यांच्या नेतृत्वाखाली दोन टीम संबंधित आरोपींचा शोध घेत होत्या. तपासात पवन उर्फ भुरा रामदास आर्या (रा.इंदोर मध्यप्रदेश) याचे नाव समोर आले होते. आर्या व त्याच्या सहकाऱ्यांनी जळगाव, बुलडाणा, जालना, बीड, सांगली, कोल्हापूर, धारवाडा आदी ठिकाणी अशा चोऱ्या केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने इंदोर येथे धाव घेवून आरोपी पवन उर्फ भुरा रामदास आर्या याला जेरबंद केले. त्याच्याकडून कारसह जवळपास १६ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१५ दिवसांचा मुक्काम
विशेष पथकाने आरोपीचा शोध घेण्यासाठी इंदोर व परिसरात पंधरा दिवसांचा मुक्काम केला. मिळालेली माहिती व आर्थिक विश्लेषण करून आरोपीच्या मुस्क्या आवळण्यात आल्या आहेत. आरोपीने त्याच्या दोन साथीदारांसह जालना जिल्ह्यात तीन घरफोड्या केल्याची कबुली दिली. तसेच जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, बीड, सांगली, कोल्हापूर, कर्नाटक येथे घरफोड्या केल्याची कबुली दिली.
२१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
आरोपी पवन उर्फ भुरा रामदास आर्या याला शनिवारी ताब्यात घेण्यात आले होते. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर त्याच्याकडून १६ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कॅप्शन : जप्त केेलेल्या मुद्देमालासह जालन्याचे पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख व इतर. (१७ जेएनपीएच १८)
===Photopath===
170221\17jan_1_17022021_15.jpg
===Caption===
कॅप्शन : जप्त केेलेल्या मुद्देमालासह जालन्याचे पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख व इतर. (१७ जेएनपीएच १८)