जालन्यात पुढील सप्ताहात पासपोर्ट कार्यालय सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 00:42 IST2018-03-18T00:41:46+5:302018-03-18T00:42:02+5:30

जालना येथील मुख्य पोस्ट कार्यालयात पुढील आठवड्यात पासपोर्ट कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शनिवारी दिली.

In Jalna next week, the passport office is open | जालन्यात पुढील सप्ताहात पासपोर्ट कार्यालय सुरू

जालन्यात पुढील सप्ताहात पासपोर्ट कार्यालय सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील मुख्य पोस्ट कार्यालयात पुढील आठवड्यात पासपोर्ट कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शनिवारी दिली. जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी पोस्ट कार्यालयात जाऊन जागेची पाहणी करून पासपोर्ट कार्यालय उभारणीच्या जागेला मान्यता दिली आहे. जालन्यात हे कार्यालय सुरू व्हावे म्हणून खा. दानवे यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेऊन पासपोर्ट कार्यालयास मंजुरी देण्याची विनंती केली होती. पासपोर्ट कार्यालयाचा जिल्ह्यातील नागरिकांना फायदा होणार असल्याचे खा. दानवे यांच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

Web Title: In Jalna next week, the passport office is open