जालना : कंत्राटदाराने केलेल्या कामांचे बिल काढण्यासाठी दहा लाख रुपयांची लाच घेणारे जालना मनपाचे आयुक्त संतोष खांडेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने गुरुवारी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे ही कारवाई आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी रात्री ७:३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. आयुक्तांनी रक्कम स्वीकारल्यानंतर तक्रारदाराने पथकातील अधिकाऱ्यांना मिसकॉल दिला आणि त्यानंतर खांडेकराना रंगेहाथ पकडण्यात आले. खांडेकर ट्रॅपमध्ये अडकल्याचे समजताच काही युवकांनी ‘एसीबी’च्या कार्यालयासमोरच फटाके फोडून कारवाईचे स्वागत केले.
जालना शहरातील वाल्मीकनगर, गांधीनगरचा भाग डीपी रोड ते रिंगरोड दरम्यान रस्त्याचे काम झाले होते. शिवाय मनपाच्या इमारतीवरील बांधकाम व इतर कामेही सुरू आहेत. या कामांचे बिल काढण्यासाठी संबंधित कंत्राटदारांनी मनपाचे आयुक्त खांडेकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. परंतु, खांडेकरांनी लाचेची मागणी केली होती. त्यामुळे ‘एसीबी’कडे तक्रार देण्यात आली होती. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर गुरूवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास खांडेकर यांच्या शासकीय निवासस्थानी सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडे लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारताच खांडेकरांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अधीक्षक बी. एस. जाधवर यांनी सांगितले.
मूळ गावीही पोलिससंतोष खांडेकर यांच्या जालन्यातील शासकीय निवासस्थानाची रात्री उशिरापर्यंत झाडाझडती सुरू होती. शिवाय त्यांचे मूळ गाव असलेल्या हणमंतगाव (ता. सांगोला) येथील घराचीही पोलिसांकडून झाडाझडती घेतली जात आहे. या झाडाझडतीत हाती काही लागले की नाही याची माहिती उशिरापर्यंत समजू शकली नाही.
एसीबीच्या कार्यालयाबाहेर पदाधिकारी, गुत्तेदारखांडेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात नेल्याचे समजताच माजी नगरसेवकांसह मनापातील अधिकारी, कर्मचारी, अनेक गुत्तेदारही एसीबीच्या कार्यालयाबाहेर जमा झाले होते. खांडेकरांच्या कार्यप्रणालीचे किस्सेही चर्चिले जात होते.
फाईल घेऊन कर्मचारी घराकडेआयुक्त संतोष खांडेकर यांनी गुरुवारी सायंकाळी ६:४५ पर्यंत बैठका घेतल्या. त्यानंतर ते घराकडे गेले. त्यावेळी एका कर्मचाऱ्यामार्फत स्वाक्षरीसाठी फायली घराकडे मागविण्यात आल्याची चर्चाही कारवाईस्थळी उपस्थित मनपाचे अधिकारी, कर्मचारी करीत होते.
नगरपालिकेत सीओ, मनपाचे आयुक्तजालना नगरपालिकेत २०१६ ते २०१९ या कालावधीत मुख्याधिकारी म्हणून संतोष खांडेकर यांनी काम पाहिले होते. त्यानंतर जून २०२२ मध्ये परत ते जालन्यात रुजू झाले होते. मनपाचे आयुक्त आणि प्रशासक म्हणूनही त्यांच्याकडेच पदभार होता. १० लाखांची लाच घेताना त्यांना गुरुवारी पकडण्यात आले.
Web Summary : Jalna's Municipal Commissioner, Santosh Khandekar, was arrested for accepting a ₹10 lakh bribe. He was caught at his residence after demanding money to clear contractor bills, sparking celebratory firecrackers outside the ACB office. Police also searched his ancestral home.
Web Summary : जालना के मनपा आयुक्त संतोष खांडेकर ₹10 लाख की रिश्वत लेते गिरफ्तार। ठेकेदार के बिल पास कराने के लिए रिश्वत मांगी। गिरफ्तारी के बाद एसीबी कार्यालय के बाहर जश्न मनाया गया। पुलिस ने उनके पैतृक घर की तलाशी भी ली।