जालना महोत्सव; मंडप उभारणीचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 01:12 IST2018-05-10T01:12:01+5:302018-05-10T01:12:01+5:30

येत्या १८ ते २२ मे दरम्यान जालन्यात आयोजित पाच दिवसीय जालना महोत्सवासाठी (फेस्टिवल) उभारण्यात येणाऱ्या मंडप उभारणीच्या कामाचे बुधवारी मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

Jalna Festival; Bhumi Pujan of pendol | जालना महोत्सव; मंडप उभारणीचे भूमिपूजन

जालना महोत्सव; मंडप उभारणीचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येत्या १८ ते २२ मे दरम्यान जालन्यात आयोजित पाच दिवसीय जालना महोत्सवासाठी (फेस्टिवल) उभारण्यात येणाऱ्या मंडप उभारणीच्या कामाचे बुधवारी मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
येथील मंठा चौफुली जवळील, कलश मैदानात जालना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी असा मंडप उभारण्यात येणार आहे. या मंडप स्थळाचे भूमिपूजन बुधवारी गोविंद गोयल यांनी सपत्नीक भूमिपूजन केले.
या भूमिपूजन सोहळ्यास जालना महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष उद्योजक घनशाम गोयल, वीरेंद्र धोका, बंडू मिश्रीकोटकर, सुभाषचंद्र देवीदान, ब्रिजमोहन लड्डा, गणेशलाल चौधरी, भावेश पटेल, सुरेश करवा, समीर अग्रवाल, अर्जुन गेही, राजशेखर नायडू, आनंद सुराना, मनिष तवरावाला, कैलास लोया, सुदेश सकलेचा, विष्णू चेचाणी, सगिर अहेमद, डॉ.रावसाहेब ढवळे, सुरेंद्र मुनोत, शाम लखोटीया, उमेश पंचारिया, महेश भक्कड आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Jalna Festival; Bhumi Pujan of pendol