जालन्यात विमानतळ, गोरंट्याल, खोतकरांना मंत्रिपदाची लॉटरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:30 IST2021-04-01T04:30:47+5:302021-04-01T04:30:47+5:30
राजकीय पटलावरही नवीन सूर्योदय... जालन्याच्या राजकीय क्षितिजावर आ. कैलास गोरंट्याल यांना अनेक वर्षांपासून हुलकावणी देणारे मंत्रिपद या निमित्ताने मिळाले ...

जालन्यात विमानतळ, गोरंट्याल, खोतकरांना मंत्रिपदाची लॉटरी
राजकीय पटलावरही नवीन सूर्योदय...
जालन्याच्या राजकीय क्षितिजावर आ. कैलास गोरंट्याल यांना अनेक वर्षांपासून हुलकावणी देणारे मंत्रिपद या निमित्ताने मिळाले असून, त्यामुळे काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांना महामंडळ, तर माजी जिल्हाध्यक्ष आर.आर. खडके, भीमराव डोंगरे, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांनाही वैधानिक महामंडळावर संचालक म्हणून घेतले आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांना विधान परिषदेत आपला आवाज बुलंद करण्याची संधी मिळाली आहे. शेतकरी नेते आणि आता महाज्योतीचे संचालक लक्ष्मण वडले यांना लालदिव्याची गाडी मिळाली असून, शिवसेनेचे दुसरे जिल्हा प्रमुख ए.जे. बोराडे यांना एसटी महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख यांच्याकडेही आरोग्य विद्यापीठासह जालन्यात एमबीबीएस महाविद्यालय सुरू करण्याची जबाबदारी दिली असून, त्यांना कोअर टीममध्ये घेतले आहे. शिवसेनेचे नेते हिकमत उढाण यांना रेराच्या प्रमुखपदावर नेमल्याचे सांगण्यात आले. हे सर्व सत्यात उतरल्यास खऱ्या अर्थाने जालनेकरांची सर्व स्पप्ने पूर्ण होऊन जालना क्लीन ॲण्ड ग्रीन सिटी म्हणून उदयास येईल, यात शंका घेण्याचे कारणच नाही.
(ए.एफपी. न्यूज. एप्रिल फूल बनाया तो....)