शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

७ वारकऱ्यांचा बळी गेला, तरीही शेजारीच पुन्हा विहीर खोदली! जालनामार्गावर ३२ मृत्यूचे सापळे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 14:59 IST

जालना-जळागाव महामार्गालगत उघड्या विहिरी; आणखी किती बळी जाणार ?

- राहुल वरशिळजालना : दीड वर्षापूर्वी तुपेवाडी आश्रमाजवळ १९ जुलै २०२४ रोजी एक जीप चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्यालगतच्या खुल्या विहिरीत कोसळली होती. यात सात वारकऱ्यांचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला होता. तर काही जखमी झाले होते. या घटनेच्या ठिकाणी दोन्ही बाजूंनी सारख्याच अंतरावर विहिरी आहेत. यात जीप कोसळलेली विहीर संबंधित शेतकऱ्याने बुजवून शेजारीच २० फुटांवर नवीन विहीर खोदली आहे. तर दुसऱ्या बाजूला असलेल्या विहिरीला सध्या कडे टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महामार्गालगतच्या इतर विहिरी कधी बुजविणार? असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.

भोकरदन-राजूर (राज्य मार्ग २२३) ते राजूर-जालना (राष्ट्रीय महामार्ग ७५३-ए) या राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर ३२ धोकादायक विहिरी आहेत. या विहिरी रस्त्यापासून १० ते २० फुटांवर असून, अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. काही जमिनीलगत तर काही जमिनीपासून दोन ते तीन फूट उंच आहेत. जालना-जळगाव मार्गावर ४ ते ५ फूट खोलगट भागातील विहिरी दिसत नाहीत. त्यांची खोली ५० ते ६० फूट आहे. या धोकादायक विहिरींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्व विहिरी परवानगी न घेता खासगी शेतजमिनीत खोदल्यामुळे प्रवाशांचे प्राण धोक्यात आले आहेत. या मार्गावरून रोज हजारो वाहनांची वर्दळ असते. विशेषतः जत्रा, यात्रा आणि धार्मिक कार्यक्रमांच्या काळात याच रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर भाविकांचा प्रवास होतो. यासंदर्भात स्थानिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत; परंतु याकडे स्थानिक प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे.

विहिरींवर कुंपण, फलक नसल्याने बनल्या मृत्यूचा सापळाया महामार्गाच्या दोन्ही बाजूंना शेतकरी खासगी जमीन असल्याचे कारण देत परवानगी न घेता विहिरी खोदत आहेत; पण महामार्गालगत ३० मीटर अंतरावर कोणत्याही प्रकारचे बांधकाम किंवा खोदकाम करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, हे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. अधिक धक्कादायक बाब म्हणजे या विहिरी उघड्या असून, त्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा यंत्रणा, कुंपण अथवा इशारा फलक नसल्याने त्या ‘मृत्यूचा सापळा’ बनल्या आहेत.

देळेगव्हाण-गाढेगव्हाण पाटीजवळ पाच जणांचा मृत्यूटेंभुर्णी-राजूर राष्ट्रीय महामार्गावरील देळेगव्हाण-गाढेगव्हाण पाटीजवळ २९ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ५ वाजता मार्निंग वॉक करणाऱ्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात एक कार विहिरीत कोसळली होती. या अपघातात ५ जणांचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला होता. त्यानंतर सात तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर प्रशासनासह स्थानिकांना कार व मृतदेह बाहेर काढण्यात यश आले होते.

भोकरदन-राजूर मार्गावरील धोकादायक विहिरींच्या ठिकाणांची यादी :ठिकाण- संख्याचांदई पाटीनजीक - २बानेगाव पाटीनजीक - ४बानेगाव प्रकल्पानजीक - ४डावरगाव पाटीनजीक - ३बरंजळा पाटीनजीक - ३लिंगेवाडी पाटी ते सोयगाव देवी, कुंभारी पाटीदरम्यान - ७तपोवन पाटी परिसर - १तुपेवाडी आश्रम ते वसंतनगर परिसरात - ५बावणे पांगरी पुलाजवळ - १मानदेऊळगाव परिसर - १पिंपळगाव परिसर - १एकूण : ३२

English
हिंदी सारांश
Web Title : Jalna: Deadly wells persist despite past tragedy, claiming lives.

Web Summary : Despite a fatal accident where seven died, wells near Jalna remain dangerously exposed. Thirty-two open wells along the highway pose a constant threat to travelers, with locals alleging administrative negligence.
टॅग्स :AccidentअपघातJalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी