शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Jalana: 'महसूल पथक आले रे!'; वाळू माफिया पळाले, पण त्यांना 'लोकेशन' देणारे चौघे सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 11:49 IST

गोंदी ते सिद्धेश्वर फाटा गोदावरी पात्रात अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पकडला

- पवन पवार वडीगोद्री ( जालना) :अंबड तालुक्यातील सिद्धेश्वर फाटा येथील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू वाहतूक करणारा एक हायवा महसूल पथकाने गोंदी पोलिसांच्या मदतीने आज, सोमवारी पहाटे साडेचार वाजता पकडला. विशेष म्हणजे, यावेळी महसूल पथकाची माहिती वाळू माफियांना देणाऱ्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. माहिती देणाऱ्या चौघांना ताब्यात घेण्यात आले असून एक दुचाकी, एक कार आणि मोबाईल असा ४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. 

अंबड तहसीलदार यांना रविवारी रात्री वाळू तस्करीबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सोमवारी पहाटे साडेचार वाजेच्या दरम्यान महसूल पथक गोंदी पोलिसांसह गोंदी-सिद्धेश्वर फाटा येथील गोदावरी नदीपात्रात पोहचले. यावेळी छापा पडणार याची आधीच माहिती मिळाल्याने वाळू तस्कर फरार झाले. केवळ एक वाळूने भरलेला हायवा पथकाच्या हाती लागला. ही कारवाई जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, अप्पर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली  तहसीलदार विजय चव्हाण, गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, मंडळाधिकारी जायभाये, महसूल कर्मचारी रमेश वालेकर व राजेश चव्हाण, पो हे कॉ. दीपक भोजने यांच्या संयुक्त पथकाने केली.

'लोकेशन' देणारे ताब्यात घेतलेमहसूल आणि पोलिसांचे पथक गोदावरी पात्राकडे निघाले असता काही अंतरावर वाळू माफियांना मदत करणारे सक्रिय झाले. यामुळे पथकाने खाजगी गाडी वापरत रस्ता बदलला. मात्र, तरीही वाळू माफियांना 'लोकेशन' देणाऱ्यांनी पथकाचा एक दुचाकी आणि एका कारच्या माध्यमातून पाठलाग सुरू केला. आधीच माहिती मिळाल्याने पथक पोहोचण्यापूर्वीच अंधाराचा फायदा ट्रॅक्टर लोडर नदीपात्रातून पसार झाले. मात्र, पोलिसांनी वाळू तस्करांना माहिती देऊन सहकार्य करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले आहे. एक दुचाकी, एक कार आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.  

टॅग्स :sandवाळूCrime Newsगुन्हेगारीRevenue Departmentमहसूल विभाग