शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

Jalana: वाळू माफियांचा हैदोस! तहसीलदारांचा मोबाईल हिसकावला अन् अंगावर घातली गाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 18:33 IST

माफिया एवढे मुजोर झाले आहेत की त्यांनी तहसीलदारांचा मोबाईल हिसकावून घेत अधिकाऱ्यांच्या अंगावर हायवा घालून पळ काढला.

- फकिरा देशमुखभोकरदन (जालना): जिल्ह्यात वाळू माफियांची मुजोरी आता पराकोटीला पोहोचली आहे. राजूर येथे अवैध वाळू वाहतूक पकडण्यासाठी गेलेल्या महसूल आणि पोलीस पथकावर १४ जणांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, माफिया एवढे मुजोर झाले आहेत की त्यांनी जाफराबादच्या तहसीलदारांचा मोबाईल हिसकावून घेत अधिकाऱ्यांच्या अंगावर हायवा घालून पळ काढला. या प्रकरणी हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय? ८ फेब्रुवारीच्या रात्री ११ च्या सुमारास सहायक जिल्हाधिकारी बी. सरवनन यांना वाळू तस्करीची माहिती मिळाली. त्यानुसार तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे आणि जाफराबादचे प्रभारी तहसीलदार मंगेश साबळे यांच्यासह एक पथक साध्या खासगी गाडीने टेंभुर्णी रोडवर सापळा लावून थांबले होते. समोरून येणारी हायवा गाडी अडवली असता, चालक आणि १०-१२ जणांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

मोबाईल हिसकावला अन् दिली जिवे मारण्याची धमकी झटापटीच्या वेळी जाफराबादचे तहसीलदार मंगेश साबळे यांनी संपर्क करण्यासाठी मोबाईल काढला असता, आरोपी विजय टोम्पे याने त्यांचा मोबाईल हिसकावून पळ काढला. यावेळी आरोपींनी "तुम्ही आमचं काही करू शकत नाही, तुम्ही नोकरी कशा करता?" अशा भाषेत तहसीलदारांना धमकावले. इतक्यावरच न थांबता, दुसरा चालक गाडीत बसला आणि त्याने थेट महसूल पथकाच्या अंगावर हायवा घालून पळ काढला. अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला, मात्र पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले.

जिल्हाधिकाऱ्यांचा 'ॲक्शन मोड'; एमपीडीए कारवाईचे संकेत या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी तातडीने गंभीर दखल घेतली आहे. हल्ल्यातील सहभागी आणि सराईत वाळू तस्करांवर 'एमपीडीए' (MPDA) अंतर्गत तडीपारीची कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. दरम्यान, पोलिसांनी ९ फेब्रुवारी रोजी कारवाई करत एक हायवा जप्त केली असून गणेश सुरेश पालोदे याला अटक केली आहे. मात्र, घटनेतील मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Jalna: Sand Mafia Terror! Tahsildar's Phone Snatched, Vehicle Attempted Hit.

Web Summary : In Jalna, sand mafia attacked officials attempting to stop illegal transport. They snatched a Tahsildar's phone and tried to run him over with a vehicle. Police seized a truck and arrested one; others are absconding.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाsandवाळू