- पवन पवार वडीगोद्री (जालना):जालना जिल्हाधिकारी आशीमा मित्तल यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाळू माफियांविरुद्ध अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. अंबड तालुक्यातील गोदावरी पात्रातून कोट्यवधी रुपयांची वाळू तस्करी करणाऱ्या आणि परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या ४ जणांवर 'MPDA' (स्थानबद्धता) अंतर्गत १ वर्षासाठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेऊन हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली असून, उर्वरित तीन जण फरार आहेत.
कोण आहेत ते वाळू माफिया? स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये पंकज सोळुंके, सचिन उर्फ गजानन सोळुंके (दोघे रा. गोंदी), केशव वायभट (अंकुशनगर) आणि समीर पठाण (दुनगाव) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, पंकज सोळुंके हे शिवसेनेचे अंबड तालुकाप्रमुख असून जिल्हा परिषदेच्या गोंदी सर्कलमधून निवडणुकीस इच्छुक आहेत.
पोलिसांची मोठी कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील केशव वायभट याला स्थानिक गुन्हे शाखा आणि गोंदी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे. फरार असलेल्या उर्वरित तिघांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. यापूर्वी यातील आरोपींना तडीपार करण्यात आले होते, मात्र त्यांच्या गुन्हेगारी कारवाया थांबत नसल्याने आता थेट १ वर्षासाठी स्थानबद्धतेचा निर्णय घेण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे गोदाकाठच्या वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
Web Summary : Jalna authorities invoked MPDA against four individuals, including a Shiv Sena Ambard leader, for illegal sand mining. One arrested, others at large.
Web Summary : जालना में रेत माफियाओं पर बड़ी कार्रवाई। शिवसेना के एक नेता समेत चार लोगों पर अवैध खनन के आरोप में MPDA लगाया गया। एक गिरफ्तार, अन्य फरार।