शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Jalana: काळजाचा थरकाप! वाटूरमध्ये कागदात गुंडाळून नवजात अर्भक फेकले, उपचारापूर्वी अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 17:51 IST

दोषींना शोधून काढणार! पोलिसांनी जपले मृत अर्भकाचे डीएनए सॅम्पल; तपास वेगाने सुरू.

- अझहर शेखवाटूर (जालना):जालना जिल्ह्यातील वाटूर येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील मुख्य चौकातील एका बेकरीच्या पायरीवर शुक्रवारी (दि. ६ फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास एक नवजात स्त्री जातीचे अर्भक बेवारस अवस्थेत आढळले. दुर्दैवाने, या निष्पाप जिवाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असून, या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे २ वाजेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने या अर्भकाला कागदात गुंडाळून 'के.व्ही.के बेकरी'च्या पायरीवर ठेवले होते. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ग्रामस्थांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. अर्भकाला तातडीने वाटूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र दुपारी १२:४५ वाजता डॉ. प्रियंका माटे यांनी सदर अर्भक मृत झाल्याचे घोषित केले.

'डीएनए' नमुने राखून ठेवलेघटनेचे गांभीर्य ओळखून परतूरचे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत आणि एपीआय बी. एम. वैद्य यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मृत अर्भकाचे जिल्हा रुग्णालय जालना येथे शवविच्छेदन करण्यात आले असून, दोषींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 'डीएनए' नमुने राखून ठेवले आहेत.

सीसीटीव्हीवर पोलिसांची नजर हे अर्भक त्या ठिकाणी कोणी आणून ठेवले, याचा शोध घेण्यासाठी पोलीस आता परिसरातील सर्व दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाल करणाऱ्या व्यक्तींची माहिती घेतली जात आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या निर्दयी कृत्याचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Jalana: Newborn Found Abandoned, Dies; Police Investigate Heartless Act

Web Summary : A newborn girl was found abandoned near a bakery in Watur, Jalana. Discovered wrapped in paper, the infant tragically died before receiving treatment. Police are investigating, reviewing CCTV footage and collecting DNA samples to identify the perpetrator of this inhumane act.
टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी