जाफराबाद नगर पंचायतला अखेर अभियंता मिळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:50 AM2018-03-18T00:50:42+5:302018-03-18T00:50:52+5:30

जाफराबाद नगर पंचायतला अखेर आठवड्यातून एका दिवसासाठी का होईना; स्थापत्य अभियंता यांची नियुक्ती जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केली आहे.

 Jafarabad Nagar Panchayat finally got the engineer | जाफराबाद नगर पंचायतला अखेर अभियंता मिळाला

जाफराबाद नगर पंचायतला अखेर अभियंता मिळाला

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : जाफराबाद नगर पंचायतला अखेर आठवड्यातून एका दिवसासाठी का होईना; स्थापत्य अभियंता यांची नियुक्ती जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केली आहे. स्थापनेपासून जाफराबादला बांधकाम अभियंता मिळत नसल्याने शहरातील सर्व बांधकाम व्यवसाय अडचणीत सापडला होता. सोबत नवीन बांधकाम करण्यासाठी नगर पंचायतकडे परवान्याची मागणी करून देखील परवाने मिळत नाही. म्हणून याविषयी नागरिक व नगर पंचायत पदाधिकारी यांच्यामध्ये तीव्र नाराजीचा सूर होता.
ग्रामपंचायतीमधून नव्याने नगर पंचायतीचा दर्जा मिळून मोठी विकास कामे होतील अशी अपेक्षा होती.मात्र जो निधी आहे. तो खर्च करण्याकरिता कार्यालयाकडे स्थायी कर्मचारी नाही. म्हणून नागरिकांना जवळपास गेल्या सव्वादोन वर्षाच्या काळात मोठा त्रास सहन करावा लागत आहे मुख्याधिकाऱ्यांचे पद सोडल्यास बाकी सर्व अस्थायी कर्मचारी असल्याने वेळेत कामे होत नाहीत. किमान आता बांधकाम व्यावसायिकांची कामे सुरळीत होण्यासाठी भोकरदन नगर परिषद कार्यालयामध्ये कार्यरत असलेले स्थापत्य अभियंता डी.एस.जाधव यांना आठवड्यातून एक दिवस मंगळवार हा दिवस जाफराबादसाठी प्रतिनियुक्तीवर पदभार देण्यात आला आहे. नगर पंचायतीला अभियंता मिळाल्याने नगर पंचायतीचा हजारो रुपयांचा बुडणारा महसूल जमा होण्यास आता मदत होणार आहे. जिल्हाधिकाºयांनी लोकमत वृत्ताची दखल घेत १४ मार्च रोजी या आशयाचे आदेश काढून जाफराबाद नगर पंचायतीला कळविले आहे.
जाफराबादला नगर पंचायतचा दर्जा मिळून व नगराध्यक्षपदाची निवड होऊन जवळपास सव्वादोन वर्षे पूर्ण होत आहे. परंतु शहर विकास आराखडा तयार करण्याकरिता कायम अधिकारी नसल्याने विकास थांबला आहे. इतर रिक्त पदे भरण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Web Title:  Jafarabad Nagar Panchayat finally got the engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.