जाधव यांची चंदनझिरा, तर कौठाळे यांची सायबरमध्ये बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:34 IST2021-03-09T04:34:01+5:302021-03-09T04:34:01+5:30
जालना शहरातील विविध पोलीस ठाण्यांमधील काही अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आलेला आहे. पोलीस दलातील अधिकाऱ्यांचा कार्यकाळ हा अविभाज्य घटक ...

जाधव यांची चंदनझिरा, तर कौठाळे यांची सायबरमध्ये बदली
जालना शहरातील विविध पोलीस ठाण्यांमधील काही अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आलेला आहे. पोलीस दलातील अधिकाऱ्यांचा कार्यकाळ हा अविभाज्य घटक असतो. मार्च महिन्यात बहुतांश वेळा बदल्या होत असतात. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी शहर वाहतूक पोलीस ठाण्याचे पो. नि. यशवंत जाधव यांची बदली चंदनझिरा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकपदी केली आहे, तर चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पो. नि. शामसुंदर कौठाळे यांची सायबरमध्ये नेमणूक केली आहे. सोमवारी दुपारी जाधव यांनी पदभार देखील स्वीकारला.
जाधव यांनी यापूर्वी जिल्ह्यातील काही ठाण्यांचा पदभार सांभाळलेला आहे. त्यांनी खून, दरोडे, दुचाक्या चोरीसह विविध गुन्हे उघडकीस आणले आहेत. दोन महिन्यांपूर्वीच वाहतूक शाखेचा चार्ज सांभाळताना त्यांनी आष्टी ठाण्यात दाखल असलेल्या किचकट गुन्ह्याचा तपास केला आहे. महिनाभरानंतर मृतदेह व दुचाकी पाण्यातून बाहेर काढून गुन्ह्याचा उलगडा केला आहे.