नळणीच्या सरपंचपदी जाधव, तर चंदवाडे उपसरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:29 IST2021-02-13T04:29:37+5:302021-02-13T04:29:37+5:30
नळणी (बु) : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रतिभा विकास जाधव यांची, तर उपसरपंचपदी सुमन रामसिंग चंदवाडे यांची निवड करण्यात आली ...

नळणीच्या सरपंचपदी जाधव, तर चंदवाडे उपसरपंच
नळणी (बु) : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रतिभा विकास जाधव यांची, तर उपसरपंचपदी सुमन रामसिंग चंदवाडे यांची निवड करण्यात आली आहे.
नळणी (बु.) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलला धूळ चारत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पुरस्कृत पॅनलने विजय मिळविला होता. निवडणूक निर्णय अधिकारी माने यांच्या उपस्थितीत आयोजित विशेष बैठकीत सरपंचपदी प्रतिभा विकास जाधव यांची, तर उपसरपंचपदी सुमन रामसिंग चंदवाडे यांची निवड करण्यात आली. यावेळी नूतन सदस्य कल्याण अण्णासाहेब जाधव, झेंडुसिंग सांडूसिंग बेडवाळ, मंगलसिंग फुलसिंग सिंगल, कोंडिबा गहनाजी पगारे, अनुसया रमेश जाधव, अलका अर्जुन सुलाने, ताराबाई केसरसिंग घुनावत, आरती उत्तम पगारे यांची उपस्थिती हाती.
यावेळी धायगुडे, फाटे, माने यांनी निवडणुकीसाठी काम पाहिले. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंगेश जाधव, बाबा पठाण, सत्यनारायण श्रीराम लोहिया, विजयप्रकाश लोहिया, कैलास पगारे, पांडुरंग पगारे, बुधसिंग सिंगल, धोंडिबा जाधव, प्रल्हादराव जाधव, गोपाल जाधव, उमेश जाधव, योगेश जाधव, साहेबराव जाधव, शालिकराम जाधव, कुंडलिक साठे, जगन पगारे, गौतम सिंगल, विजयसिंग सिंगल, अथर्व जाधव, वेदांत जाधव, सिद्धू जाधव, श्रेयश लोहिया, निखिल जाधव, सुनील जाधव, लखन चंदवाडे, बाळू जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.