चित्रातील रामापेक्षा कष्टकऱ्यांच्या घामाला महत्त्व देणे गरजेचे - धनाजी गुरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:24 AM2019-04-10T00:24:51+5:302019-04-10T00:24:55+5:30

भाजपकडून संविधानाला धोका असून, जनतेने त्यांच्या भूलथापांना बळी न पडता जातीयवादी सरकारला हद्दपार करण्याची संधी त्यांना आगामी काळात असल्याचे रोखठोक प्रतिपादन ज्येष्ठ कामगार नेते धनाजी गुरव (कोल्हापूर) यांनी मंगळवारी केले.

It is necessary to give importance to the labor of laborers rather than Ram in the picture - Dhanaji Gurav | चित्रातील रामापेक्षा कष्टकऱ्यांच्या घामाला महत्त्व देणे गरजेचे - धनाजी गुरव

चित्रातील रामापेक्षा कष्टकऱ्यांच्या घामाला महत्त्व देणे गरजेचे - धनाजी गुरव

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राम मंदिर, पाकिस्तान आणि अन्य अनेक भावनिक मुद्यांवर भाजपकडून सामान्यांची दिशाभूल केली जात आहे. आम्हाला चित्रातील रामापेक्षा कष्टकऱ्यांच्या घामाला सन्मान आणि त्यांच्या कष्टाला योग्य दाम मिळणे गरजेचे आहे. भाजपकडून संविधानाला धोका असून, जनतेने त्यांच्या भूलथापांना बळी न पडता जातीयवादी सरकारला हद्दपार करण्याची संधी त्यांना आगामी काळात असल्याचे रोखठोक प्रतिपादन ज्येष्ठ कामगार नेते धनाजी गुरव (कोल्हापूर) यांनी मंगळवारी केले.
डाव्या आघाडीतर्फे मंगळवारी डॉ. भगवानसेवा मंगल कार्यालयात श्रमिक जनतेच्या जाहीरनाम्याचे जाहीर वाचन करण्यात येऊन त्यांवर विचार मंथन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी माजी मंत्री शंकरराव राख हे होते. यावेळी कामगार नेते आसाराम लोमटे, प्रा. संजय लकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रा. लकडे यांनी केले. त्यांनी या कार्यक्रमाचा उद्देश विशद केला.
पुढे बोलताना धनाजी गुरव यांनी चौफेर मांडणी केली. एकूणच श्रमिकांचे कैवारी म्हणून घेणारे हे केंद्र आणि राज्य सरकार केवळ जुमले बाजी करते. अर्थसंकल्पात लोक कल्याणकारी योजनांची जंत्री वाजवायची आणि प्रत्यक्षात त्यावर कवडीही खर्च करायची नाही, अशी अवस्था या सरकारांनी केली आहे. लोकशाहीला आता भारतात पर्याय नाही, परंतु ती चांगली लोकशाही हवी. केवळ मूठभरांच्या हाती सत्ता असल्याने त्यांना हवे तसेच ते वदवून घेत आहेत.
पाकिस्तानवर हल्ला करून त्याचा निवडणुकीत उपयोग होत असेल तर, ही बाब आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही देखील देशप्रेमी आहोत. परंतु राम मंदिर आणि पाकिस्तानचे भावनिक मुद्दे जनमानसावर बिंंबवून गंभीर प्रश्नांपासून निवडणूक दूर नेली जात आहे. हे त्यांचे षडयंत्र असल्याचा आरोपही गुरव यांनी केला. श्रमिकांनी देखील त्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आसाराम लोमटे यांनी सिंचन, शेतकरी तसेच अन्य महत्त्वाच्या मुद्यांवर लोमटे यांनी विचार मांडले. महाराष्ट्रात माथाडी, रोजगार हमी आणि अन्य अनेक कायदे हे कामगार संघटनांनी एकत्रित येऊन केल्यानेच त्यांचे आज मोठे महत्त्व आणि गरज निर्माण झाली आहे. आज जायकवाडीतील पाणीपातळी शून्य टक्क्यांवर आली असून, नगर, नाशिक मधून आपल्याला पाणी देण्यास विरोध होणे ही बाब निश्चित एकसंध महाराष्ट्राला न शोभणारी असल्याचे प्रतिपादन संजय लकडे यांनी केले.
यावेळी माजी मंत्री शंकरराव राख यांनी अध्यक्षीय समारोप केला. त्यांनी सद्यस्थितीवर परखड मत मांडून देशातील एकूणच प्रचार आणि पंतप्रधान मोदींच्या धोरणाचा समाचार घेतला. यावेळी कामगारनेते अण्णा सावंत, प्रा. नारायण बोराडे, प्रा. राजकुमार वलसे, डॉ. रमेश अग्रवाल, यशवंत सोनुने, अनिल मिसाळ, संदीप शिंदे, प्रा.सुभाष देठे, शेख मुजीब, शेख शाकीर आदींची उपस्थिती होती.
भांडवलदारांसाठी पायघड्या
देशाचे पंतप्रधान म्हणवून घेणारे नरेंद्र मोदी यांनी बीएसएनएल पूर्णपणे डबघाईला आलेले असताना अंबानींच्या मोबाईल कंपनीला जी मदत केली आहे ती निश्चित चुकीची म्हणावी लागेल. शिक्षण, आरोग्य, निवारा पुरवणे हे कल्याणकारी राज्याचे ध्येय आहे. असे असताना महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे हे आम्हाला शाळा चालवणे परवडत नसल्याने आम्ही त्या बंद करत असल्याचे सांगतात शाळा चालवणे म्हणजे सरकारने काय उद्योग समजला आहे काय, असा सवालही गुरव यांनी केला.

Web Title: It is necessary to give importance to the labor of laborers rather than Ram in the picture - Dhanaji Gurav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.