दुसऱ्याच्या घरात झाकून पाहण्याचे काम भाजपचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:36 IST2021-08-18T04:36:01+5:302021-08-18T04:36:01+5:30

जालना येथे आयोजित सत्कार कार्यक्रमात बोलत होते. भाजपने इंधन दरवाढीची सेंच्युरी केली आहे. आता दुसरी सेंच्युरी करण्यासाठी जन आशीर्वाद ...

It is the BJP's job to cover another's house | दुसऱ्याच्या घरात झाकून पाहण्याचे काम भाजपचे

दुसऱ्याच्या घरात झाकून पाहण्याचे काम भाजपचे

जालना येथे आयोजित सत्कार कार्यक्रमात बोलत होते. भाजपने इंधन दरवाढीची सेंच्युरी केली आहे. आता दुसरी सेंच्युरी करण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा काढली की काय? असा प्रश्न जनता विचारत आहे. आज देशात महागाई वाढली आहे. बेराेजगारांचे, कामगारांचे, शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न आहेत. हे प्रश्न वाढविण्यासाठी भाजपने यात्रा काढली का? असाही प्रश्न असल्याचे पटोले म्हणाले. पंकजा मुंडे यांचे सांत्वन करण्यासाठी ही यात्रा परळीतून सुरू केली का या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, त्यांच्या पक्षात काय होते यावरून आम्हाला काही घेणे-देणे नाही. दुसऱ्याच्या घरात झाकून पाहण्याचे काम काँग्रेसचे नाही ते भाजपचे काम आहे. मोदी सरकारने लोकांची प्रायव्हसी संपवून मोबाइल टॅप करणे, सर्वांची माहिती ठेवण्याचे काम केले आहे. हे जासूसीचे काम भाजपवाले करतात. आम्ही लोकशाहीला मानणारे आहोत. त्यांच्या मनात काय आहे हे देशातील जनतेला आजही कळले नाही. लाल किल्ल्यावरील भाषणात मोदींनी शेतकरी प्रश्नासह इतर महत्त्वाचे उल्लेख केलेले नाहीत. अशा विक्षिप्त मानसिकतेची लोकं राजकारणात आल्याने देशाचा सत्यानाश झाल्याची घणाघाती टीकाही पटोले यांनी केली.

जिल्हा काँग्रेसच्या वतीने सत्कार

नाना पटोले यांचा जिल्हा काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, कल्याण काळे, भीमराव डोंगरे, रवींद्र दळवी, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, आर. आर. खडके, प्रभाकर पवार, शहराध्यक्ष शेख महेमूद, सत्संग मुंढे व इतरांची उपस्थिती होती.

Web Title: It is the BJP's job to cover another's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.