शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पाणी सोडण्याच्या मुद्द्यावरून पाणी तापले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:27 IST

निम्न दुधनाचे पाणी तापू लागले असून, परभणीकडे पाणी सोडण्याचा मुद्दा ऐरणीवर येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : निम्न दुधनाचे पाणी तापू लागले असून, परभणीकडे पाणी सोडण्याचा मुद्दा ऐरणीवर येत आहे. परंतु, धरणात केवळ १४ .१५ टक्के जिवंत पाणीसाठा राहिला आहे.यावर्षी पावसाचे प्रमाण जेमतेम असल्याने निम्न दुधना प्रकल्पात पाणी साठ्यात वाढ झाली नाही. पूर्ण पावसाळ््यात केवळ दहा टक्के पाणी साठा वाढला. या धरणावर परतूर, सेलूसह अनेक खेड्या - पाड्यांचा व सिंचनाचा भार आहे. यावर्षी धरणातून दोन ते तीन वेळा पाणी सोडण्यात आले.हे पाणी खाली नदीच्या पात्रात सोडल्याने पाण्याचा मोठा अपव्ययही होत आहे. मध्येच शेतकरीही या पाण्याचा उपसा करत आहे. या धरणातील बँक वॉटरवर शेतकऱ्यांनी लाखो रूपये कर्ज काढून पाईप लाईन केल्या आहेत.या परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र वाढले आहे. आता धरणात पाणी कमी असल्याने व दररोजच्या उपशाने हे पाणी पातळी खालावत आहे. त्यामुळे शेतक-यांनाही पाणी मिळेल की, नाही या बाबत शंका आहे. यातच पुन्हा हे पाणी परभणीकडे सोडण्यासाठी मंत्रालय स्तरावर सर्व सोपस्कार पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते.परभणी व जालन्याचे जिल्हाधिकारी पाणी सोडण्याचा निर्णय लवकरच घेणार आहेत. त्यामुळे आहे, ते पाणी कसे पुरेल या चिंतेत परतूरकर असल्याने हे पाणी आतापासून तापत आहे.या धरणात संध्या एकूण साठा १४.१५ टक्के आहे, तर एकूण पाणी साठा ३८ टक्के आहे. आता हे पाणी सोडण्यासाठी एक राजकीय गट प्रयत्नशील आहे. तर दुसरा गट आमचे ह्क्काचे पाणी सोडू देणार नाही, असा पावित्रा घेत विरोध करत आहे. त्यामुळे भविष्यात हे निम्न दुधनाचे पाणी चांगलेच ‘तापण्याची’ शक्यता वर्तविण्यात येत आहे.पाणी सोडण्याचा निर्णयही ब-याच अंशी राजकीय गणित मांडूनच घेण्यात येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पाणी सोडायचे की, नाही हा कळीचा मुद्दा होऊ लागला आहे. या धरणातील पाणी पातळी दिवसेंदिवस घटु लागली आहे. या धरणावरच आता परतूर, सेलू शहरासह ३० ते ४० खेड्यांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. या धरणातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. परत आता हे पाणी परभणीकडे सोडण्याचा घाट घातला जात असल्याने येत्या पावसाळ््यापर्यंत धरणातील पाणी पुरेल की नाही, या बाबत शंका आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई