टाकरखेडा परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:57 IST2021-02-18T04:57:18+5:302021-02-18T04:57:18+5:30
देऊळगावराजा : राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम २०२०- २१ साठी वसुंधरा अभियानांतर्गत देऊळगाव मही ग्रामपंचायतची निवड करण्यात ...

टाकरखेडा परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद
देऊळगावराजा : राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम २०२०- २१ साठी वसुंधरा अभियानांतर्गत देऊळगाव मही ग्रामपंचायतची निवड करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची बुलडाणा जिल्हा परिषदेचे कृषी सभापती राजेंद्र पळसकर, जि. प. सदस्य धनशिराम शिंपणे, कृषी विकास अधिकारी अनिसा महाबळे यांनी पाहणी केली.
यावेळी पशु संवर्धन अधिकारी ठाकरे, जिल्हा कृषी अधिकारी सी. एन. पाटील, तालुका कृषी अधिकारी मासाळकर, पंचायत समिती कृषी अधिकारी बी. आर. लवंगे, के. डी. चिंचोले, ग्रामविकास अधिकारी रिंढे आदींची उपस्थिती होती.
वसुंधरा अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविले जात असून, त्यासाठी २ ऑक्टोबर २०२० ते २ मार्च २०२१ या कालावधीत विविध कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले, तसेच शासनाच्या विकेल ते पिकेल, या धोरणाचा अवलंब करणाऱ्या देऊळगाव मही, टाकरखेड भागिले, सुरा येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करण्यात आले.
फोटो