शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

एसआरपीएफ कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या कराव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:58 IST

जालना : एसआरपीएफ अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या पूर्वीप्रमाणेच कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र विधिमंडळ आश्‍वासन ...

जालना : एसआरपीएफ अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या पूर्वीप्रमाणेच कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र विधिमंडळ आश्‍वासन समितीचे प्रमुख आमदार कैलास गोरंट्याल यांनी बुधवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. या मागणीबाबत सकारात्मक विचार करून मंत्रिडळाच्या बैठकीत ठोस निर्णय घेण्यात येइल, असे आश्‍वासन देशमुख यांनी दिले आहे.

एसआरपीएफ ग्रुप ही राज्यात सातत्याने कार्यरत आहेत. नियमित पोलीस जवानांसोबत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या ग्रुपमधील जवान नेहमीच आघाडीवर असतात. कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या नियमांत पूर्वी दहा वर्षांच्या कार्यकालाची मर्यादा होती. मात्र, मागील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी नियमांत बदल करून हा कार्यकाळ पंधरा वर्षांचा केला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभर एसआरपीएफ ग्रुपमधील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आणि असंतोष पसरलेला आहे. त्यामुळे या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन बदल्यांची कार्यकालाची मर्यादा पूर्वीप्रमाणेच करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार गोरंट्याल यांनी केली आहे.

सकारात्मक प्रतिसाद

आमदार गोरंट्याल यांच्याशी झालेल्या चर्चेत गृहमंत्री देशमुख यांनी बदल्यांच्या कार्यकालाची मर्यादा पूर्वीप्रमाणेच ठेवण्यासाठी आपण सकारात्मक भूमिका घेऊ. लवकरच हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर मांडून त्याबाबत ठोस निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही गृहमंत्री देशमुख यांनी दिल्याचे आमदार गोरंट्याल यांनी सांगितले.