रोहयो कामांची दिल्लीच्या पथकाकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:38 IST2021-02-25T04:38:33+5:302021-02-25T04:38:33+5:30
दि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज, हैद्राबाद यांच्यामार्फत रोहयोच्या कामांचा अभ्यास सुरू आहे. याकरिता देशातील ...

रोहयो कामांची दिल्लीच्या पथकाकडून पाहणी
दि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज, हैद्राबाद यांच्यामार्फत रोहयोच्या कामांचा अभ्यास सुरू आहे. याकरिता देशातील २४ राज्यांची निवड करण्यात आली असून, यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. त्यानुसार कडेगाव येथील कामांची बुधवारी पथकामार्फत पाहणी करण्यात आली. पथकाने रेशीम प्रकल्प, गांडूळ खत प्रकल्प, जनावरांचे गोठे, फळबाग लागवड आदी विविध कामांची पाहणी केली. तसेच यामधील लाभार्थ्यांकडून कामाची मंजुरी, मंजूर रक्कम, काम पूर्ण केले का, मिळालेले अनुदान, या केलेल्या कामांमुळे उत्पन्नात वाढ झाली का, रेशीमचे उत्पादन व त्याची विक्री अशा विविध बाबींची माहिती घेतली. यावेळी तहसीलदार छाया पवार, गटविकास अधिकारी विठ्ठल हारकळ, विस्तार अधिकारी समीर जाधव, रतन झिने, हरी पवार, पालवे, वाघ, राऊत, भीमराव जाधव, योगेश निंबाळकर आदींची उपस्थिती होती.
फोटो