दोन दिवसात ३७ जणांना बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:05 IST2021-02-05T08:05:31+5:302021-02-05T08:05:31+5:30
जालना : गत दोन दिवसात जिल्ह्यातील ३७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर कोरोनामुक्त ...

दोन दिवसात ३७ जणांना बाधा
जालना : गत दोन दिवसात जिल्ह्यातील ३७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या ३७ जणांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मंगळवारी प्राप्त अहवालात १४ जणांना बाधा झाल्याचे समोर आले होते. या बाधितांमध्ये जालना शहरातील आठ, जाफराबाद शहर एक, टेंभुर्णी एक, पठार देऊळगाव येथील दोन व बुलडाणा येथील दोघांना बाधा झाल्याचे समोर आले होते. तर मंगळवारी कोरोनामुक्त चौघांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. बुधवारी प्राप्त अहवालानुसार २३ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यात जालना शहरातील सहा, इंदेवाडी येथील एक, मंठा तालुक्यातील वाई येथील एक, परतूर तालुक्यातील आनंदवाडी येथील एकाचा समावेश आहे. बदनापूर तालुक्यातील भाटखेडा येथील एक, जाफराबाद तालुक्यातील साखरखेडा- एक, शिराळा- एक, वाढोणा- एक, इस्लामवाडी- एक, दहिगाव- एक, देऊळझरी येथील एकाला कोरोनाची बाधा झाली आहे. भोकरदन शहरातील तीन, सोयगाव- एक व जानेफळ येथील एकाला बाधा झाल्याचे समोर आले आहे. उपचार सुरू असताना बुधवारी एका रूग्णाचा मृत्यू झाला. दरम्यान, जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३ हजार ६३६ वर गेली असून, त्यातील ३६४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजवर १३ हजार ८३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.