शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
4
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
5
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
8
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
9
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
10
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
11
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
16
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
17
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
18
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
19
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
20
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले

ऑनलाईनमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढले डोळ्यांचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 04:05 IST

पालकांची वाढली चिंता; विविध शैक्षणिक ॲपचा मोठा वापर, मैदानी खेळाकडे होतेय दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क जालना : कोरोनामुळे ...

पालकांची वाढली चिंता; विविध शैक्षणिक ॲपचा मोठा वापर, मैदानी खेळाकडे होतेय दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : कोरोनामुळे मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. यामुळे तासनतास विद्यार्थी मोबाईलचा वापर करीत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना डो‌ळ्याच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांची मानसिक व शारिरीक वाढ खुंटली आहे.

राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील नऊ ते दहा महिन्यांपासून शाळा महाविद्यालये बंद आहेत. अशा वेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शासनाने ऑनलाईन शिक्षण देण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत. त्यानुसार बहुतांश शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू आहे.

परंतु, ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यी तासनतास मोबाईलचा वापर करीत आहे. तर काही विद्यार्थी ऑनलाईन गेम्स खेळत असल्याने मैदानी खेळांकडे विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांची शारिरीक व मानसिक वाढ खुंटली आहे. बहुतांश विद्यार्थ्यांना डोळेदुखी, भूक न लागणे आदी आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे बालरोग तज्ञांनी सांगितले.

एका खासगी रूग्णालयात मागील काही दिवसांपासून डोळ्याच्या आजाराचे रूग्ण वाढले आहेत. मागील महिन्याभरात तब्बल १५० विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पालकांनी जास्तवेळ विद्यार्थ्याकडे मोबाईल देवू नये, असे आवाहन बालरोग तज्ञांनी केले आहे.

ऑनलाईन शिक्षणाचे होणारे दुष्परिणाम

शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शासनाने ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. परंतु, याच्या दुष्परिणामामुळे पालक चिंतेत आहे. मैदानी खेळांकडे दुर्लक्ष, सतत मोबाईलचा वापर केल्याने डोके दुखणे, शारिरीक मानसिक वाढ खुंटणे, भूक न लागणे, वेळेवर झोप न होणे आदी आजारांमुळे विद्यार्थी त्रस्त आहेत.

मोबाईलचा वापर कमी करा

कोरोनामुळे राज्यात मागील काही दिवसांपासून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. यामुळे मोबाईलचा वापर वाढला असून, बहुतांश विद्यार्थ्यांना डोळ्याच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. पालकांनी काळजी घ्यावी.

-डॉ.प्रदीप पंडित,

बालरोग तज्ञ