शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोवरील मजूर संख्येत झाली वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:47 IST

वसाने दिलेली ओढ व तीव्र पाणीटंचाईमुळे शेतातील कामे थांबली असतानाच, आता मनरेगांतर्गत (महात्मा गांधी रोजगार हमी) जिल्हाभर सुरू असलेल्या कामांवर मजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाने दिलेली ओढ व तीव्र पाणीटंचाईमुळे शेतातील कामे थांबली असतानाच, आता मनरेगांतर्गत (महात्मा गांधी रोजगार हमी) जिल्हाभर सुरू असलेल्या कामांवर मजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात यावर्षी एकदाही समाधानकारक पाऊस न झाल्याने राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर यावर्षी सुरू असलेल्या मनरेगाच्या कामांवर ३५ हजारांवर मजूर काम करत आहेत.जिल्ह्याला नेहमीच दुष्काळाच्या झळांनी होरपळत असतो. पाणी योजनांच्या माध्यमातून यातील काही भागात पाणी पोहोचले असले तरी, पाचवीला पुजलेला दुष्काळ हटण्याचे नाव घेत नाही. यामुळेच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. स्वाभाविकपणे शेतीतील कामे थांबली आहेत. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतही दुष्काळाची दाहकता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कामे करण्याबरोबरच मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्राधान्य दिले आहे.रस्त्यांची दुरूस्ती, रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड, मुरुमीकरण, विहिरींची कामे, पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी फळबाग लागवड, बांधबंदिस्ती यासह इतर कामे ग्रामपंचायतीकडून सुरू आहेत. तर जलयुक्त शिवार योजनेतील अनेक कामे मनरेगाअंतर्गत सुरू आहेत.या आठवड्यातील मनरेगावर कार्यरत मजुरांचा आढावा घेतला असता, मजुरांच्या संख्येत वाढच होत आहे. जिल्ह्यात २२० कामांवर ९ हजार ३०४ मजूर कार्यरत आहेत. जिल्ह्यात १०२९ कामे सुरू असून यात ग्रामपंचायतीमार्फत २२० कामे सुरू आहेत.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाEmployeeकर्मचारीdroughtदुष्काळ