विद्यार्थ्यांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:19 IST2021-01-13T05:19:12+5:302021-01-13T05:19:12+5:30
जांबसमर्थ शिवारातील गोठ्यातून गायींची चोरी घनसावंगी : तालुक्यातील जांबसमर्थ येथील शेतकरी उध्दव शिवाजी चव्हाण यांनी शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये दोन ...

विद्यार्थ्यांची गैरसोय
जांबसमर्थ शिवारातील गोठ्यातून गायींची चोरी
घनसावंगी : तालुक्यातील जांबसमर्थ येथील शेतकरी उध्दव शिवाजी चव्हाण यांनी शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये दोन गायी बांधल्या होत्या. या दोन गायी चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी उध्दव चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
मुरारी बगडिया, रवीकुमार सूर्यवंशी यांची निवड
जालना : मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेडच्या जालना शहर संघटकपदी मुरारी कचरूलाल बगडिया यांची, तर कायदेशीर सल्लागार म्हणून रवीकुमार सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष विजय वाडेकर यांच्या हस्ते दोघांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी संदीप वाघमारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विष्णू पाचफुले यांचा निवडीबद्दल सत्कार
जालना : नगर पालिकेच्या गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल विष्णू पाचफुले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ह. भ. प. निवृत्ती पाचफुले, व्यापारी महासंघाचे जिल्हा महासचिव मनोज पाचफुले, मराठा महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रवीण पाचफुले, रोहित पाचफुले, साईराज पाचफुले, राजेश घोडे यांच्यासह पदाधिकारी, नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी विष्णू पाचफुले यांनी मनोगत व्यक्त केले.