खराब रस्त्यांमुळे चालकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:23 IST2021-01-10T04:23:00+5:302021-01-10T04:23:00+5:30
जलसंधारणासाठी मोफत जेसीबी देणार जालना : जैन संघटनेकडून राज्यभरात ‘सुजलाम् सुफलाम्’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात ...

खराब रस्त्यांमुळे चालकांची गैरसोय
जलसंधारणासाठी मोफत जेसीबी देणार
जालना : जैन संघटनेकडून राज्यभरात ‘सुजलाम् सुफलाम्’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात जलसंधारणाची कामे करण्यासाठी मोफत जेसीबी यंत्रणा देणार असल्याची माहिती जैन संघटनेचे राज्याध्यक्ष हस्तीमल बंब यांनी दिली. अंबड, घनसावंगी तालुक्यात संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी वीस मशीन उपलब्ध करून दिल्याचे सांगण्यात आले.
अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईची मागणी
जाफराबाद : तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री सुरू आहे. शहरी, ग्रामीण भागात दारू सहज उपलब्ध होत असून, युवा पिढी व्यसनाधीन होत आहे. महिलांनाही या तळीरामांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
विस्कळीत विजेमुळे शेतकऱ्यांची गैरसोय
अंबड : शेतीसाठी दिवसा व रात्री अशा दोन सत्रात वीजपुरवठा केला जात आहे. रात्रीच्यावेळी वाढलेले अपघात आणि हिंस्त्र प्राण्यांचा वावर यामुळे अनेक शेतकरी दिवसाच्या सत्रातच शेतीला पाणी देत आहेत. मात्र, तालुक्यात सतत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी होत आहे.