वरूडमध्ये बँक ग्राहकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:40 IST2021-01-08T05:40:21+5:302021-01-08T05:40:21+5:30
वरूड गावात बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेची १९९० मध्ये स्थापना झालेली असून, बँकेला परिसरातील ११ गावे जोडलेली आहेत; परंतु ...

वरूडमध्ये बँक ग्राहकांची गैरसोय
वरूड गावात बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेची १९९० मध्ये स्थापना झालेली असून, बँकेला परिसरातील ११ गावे जोडलेली आहेत; परंतु ग्राहकांच्या तुलनेत येथे अपुरा कर्मचारी वर्ग असून, यात शाखा व्यवस्थापक, उपशाखा व्यवस्थापक, लिपिक, दप्तर शिपाई, असे एकूण चार कर्मचारी आहेत; परंतु कर्मचारी वर्ग कमी व ग्राहकांची संख्या जास्त असल्याने ग्राहकांना पैसे काढण्यासाठी दोन ते तीन तास ताटकळत रांगेत उभे राहावे लागत आहे. यात वयोवृद्ध व महिलांचे मोठे हाल होत आहेत. या सोबतच बँकेत ग्राहकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था नसून, बँकेची जागा अतिशय लहान असल्याने ग्राहकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतराचेही पालन करता येत नाही. याकडे विभागीय व्यवस्थापकांनी लक्ष देऊन ग्राहकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी ग्राहक वर्गातून होत आहे.