जालन्यात आयकर विभागाचे छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:33 IST2018-01-31T00:33:33+5:302018-01-31T00:33:35+5:30
आयकर विभागाच्या औरंगाबाद येथील पथकाने शहरातील एका कारखान्यासह सात ठिकाणी छापे टाकल्याचे सूत्रांनी सांगितले.

जालन्यात आयकर विभागाचे छापे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आयकर विभागाच्या औरंगाबाद येथील पथकाने शहरातील एका कारखान्यासह सात ठिकाणी छापे टाकल्याचे सूत्रांनी सांगितले. ही कारवाई म्हणजे नियमित तपासणीचा भाग असून, कारवाईचा तपशील देण्यास आयकर विभागाच्या अधिका-यांनी नकार दिला.
रविवारी आणि सोमवार अशा दोन दिवसांपासून आयकर विभागाच्या पथकाची कारवाई सुरु होती. या कारवाईत विविध कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. कागदपत्रांतून आक्षेपार्ह बाब आढळून आल्यास संबंधितांकडून दंड वसूल करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.