शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

‘जुई, धामणा’तील गाळ काढण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:56 IST

करदन तालुक्यात कोरड्या झालेल्या दानापूर येथील जुई व धामणा धरणातील गाळ काढून तो शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकण्यासाठी प्रशासनाच्या वतीने पुढाकार घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन तालुक्यात कोरड्या झालेल्या दानापूर येथील जुई व धामणा धरणातील गाळ काढून तो शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकण्यासाठी प्रशासनाच्या वतीने पुढाकार घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, त्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी हरिंचंद्र गवळी यांनी जुई धरणातील गाळाची पाहणी केली़यावर्षी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील जुई आणि धामणा धरणात पाणीच आले नाही. त्यामुळे गेल्या दोन महिन्यां पासून ही धरणे कोरडी पडली आहेत. त्यामुळे भोकरदन शहरासह किमान ३० गावांना भीषण पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे. मात्र भविष्यामध्ये या धरणातील पाणी साठवण क्षमता वाढावी, यासाठी प्रशासनाने हालचाली सुरु केल्या असून, मंगळवारी उपविभागीय अधिकारी व इतर अधिका-यांनी धरणांची पाहणी केली. शासनाने धरणातून गाळ काढून दिल्यावर शेतक-यांनी तो आपल्या शेतात घेऊन जाण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे गवळी यांनी संगितले.उपविभागीय अधिकारी गवळी यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी धरणातील गाळाची माहिती मागविली असून, आपण तात्काळ जुई व धामणा धरणातील गाळाची माहिती देणार आहोत. शेतक-यांनी हा गाळ घेऊन जाण्यासाठी जनजागृती करणार असून, प्रत्येक गावात दवंडी देऊन व बैठका घेऊन शेतक-यांना गाळ घेऊन जाण्याचे आवाहन करू असे ते म्हणाले.तालुक्यात चारा, पाण्याचा प्रश्न गंभीरतालुक्यात सध्या कठीण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला असला तरी अद्याप तालुक्यात दुष्काळी कामे सुरू करण्यात आलेले नाही. शिवाय पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. गुरांच्या चा-यासह पिण्यासाठी पाणी नाही. शासनाने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात येत आहे असे असले तरी गुरांसाठी अद्याप कोठेही चारा छावणी सुरू केलेली नाही. गुरांना पिण्यासाठी पाणी नाही. शिवाय चारा छावणी सुरू करावयाची असल्यास पद्मावती व बाणेगाव येथील मध्यम प्रकल्पाजवळच चारा छावण्या सुरू कराव्या लागणार आहेत. दुसरीकडे तालुक्यात कोठेही पाणी साठा नाही अशी परिस्थिती पाऊस कमी पडल्याने निर्माण झाली आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाईIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प