पीककर्जासाठी ऑफलाइन पद्धत राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:28 IST2021-05-22T04:28:30+5:302021-05-22T04:28:30+5:30
जालना शहरात डेंग्यू जनजागृती मोहीम जालना : जालना जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या वतीने जालना शहरातील मधुबन कॉलनीत बुधवारी ...

पीककर्जासाठी ऑफलाइन पद्धत राबवा
जालना शहरात डेंग्यू जनजागृती मोहीम
जालना : जालना जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या वतीने जालना शहरातील मधुबन कॉलनीत बुधवारी डेंग्यू जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यावेळी डेंग्यू आजार व प्रतिबंधक उपाययोजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नगरसेविका संध्या देठे, शोभा अंबेकर, अश्विनी खरात, कावळे, आरोग्य सहायक आर.के. मंडाळ, के.टी. रगडे, के.जी. राठोड, डी. बी. भादरंगे, एस.डी. दुसाने यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाईची मागणी
अंबड : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारूची विक्री जोमात सुरू आहे. तळीरामांमुळे भांडण-तंट्यात वाढ होत असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. दारूच्या नशेत युवापिढीही व्यसनाधीन होत असून, गावात सतत तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. महिला, मुलींनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन अवैध दारूविक्रेत्यांवर सातत्याने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.