अवैध वाळू उपसा; चौघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:39 IST2021-01-08T05:39:51+5:302021-01-08T05:39:51+5:30
घरफोडीत २७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास जालना : शहरातील कचेरी रोड भागात राहणारे आकाश बाबासाहेब कोकणे यांचे घर मंगळवारी ...

अवैध वाळू उपसा; चौघांविरुद्ध गुन्हा
घरफोडीत २७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास
जालना : शहरातील कचेरी रोड भागात राहणारे आकाश बाबासाहेब कोकणे यांचे घर मंगळवारी रात्री चोरट्यांनी फोडले. चोरट्यांनी घरातील २७ हजार ८०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी आकाश कोकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार साळवे हे करीत आहेत.
हॉटेलसमोर उभा केलेली दुचाकी लंपास
जालना : जाफराबाद तालुक्यातील हिवराकाबली येथील सुनील शेजूळ यांनी त्यांची दुचाकी ३१ डिसेंबर रोजी जालना येथील बसस्थानकासमोरील एका हॉटेलसमोर लावली होती. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी सुनील शेजूळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना खर्डे करीत आहेत.
आनंदनगर भागात लावलेल्या जीपची चोरी
जालना : शहरातील पेन्शनपुरा भागात राहणारे अन्सारी अब्दुल रफिक अब्दुल वहीद यांनी त्यांची जीप मंगळवारी रात्री आनंदनगर भागातील गेटच्या जवळ लावली होती. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी ती जीप चोरून नेली. याप्रकरणी अन्सारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि भताने हे करीत आहेत.