समर्पित भावनेने सेवा केल्यास सन्मानाने निवृत्त होता येते - आकात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:59 IST2021-02-05T07:59:24+5:302021-02-05T07:59:24+5:30
परतूर : कुठल्याही क्षेत्रात समर्पित भावनेने काम केल्यास सन्मानाने सेवानिवृत्त होता येते, असे प्रतिपादन संस्थेचे सचिव तथा सभापती कपिल ...

समर्पित भावनेने सेवा केल्यास सन्मानाने निवृत्त होता येते - आकात
परतूर : कुठल्याही क्षेत्रात समर्पित भावनेने काम केल्यास सन्मानाने सेवानिवृत्त होता येते, असे प्रतिपादन संस्थेचे सचिव तथा सभापती कपिल आकात यांनी केले.
येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील प्रा. अशोक पाचपोळ हे सेवानिवृत्त झाले. त्यांना सोमवारी निरोप देण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिव कपिल आकात हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सीताराम काकडे, प्राचार्य सदाशिव मुळे, उपप्राचार्य सुधाकर जाधव, डॉ. रवी प्रधान, प्रा. संभाजी तिडके, शंकर पवार, अशोक सावळे हे होते. कपिल आकात म्हणाले, आपण ज्या ठिकाणी काम करतो, त्या ठिकाणी मन लावून तसेच इमानदारीने काम केल्यास सन्मानाने निवृत्त होता येते. शिक्षणक्षेत्रासारखे पवित्र क्षेत्र नाही. मुले घडविण्याचे पवित्र कार्य आपल्या वाट्याला आले आहे. हे काम समर्पित भावनेने केले तर, निश्चितच सन्मान मिळाल्याशिवाय राहत नाही, असेही ते म्हणाले.
अशोक पाचपोळ म्हणाले की, सेवाकाळात मला सर्वांचे सहकार्य लाभले. या ठिकाणी झालेली सेवा, संस्था व माझ्या सहकाऱ्यांना मी कधीच विसरू शकत नाही, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमास प्रबंधक दशरथ देवडे, निवृत्त प्राचार्य डॉ. भगवान दिरंगे, झेड. के. खतिब, छबूराव भांडवलकर, आत्माराम बांडगे, सय्यद अख्तर, धनंजय जागृत, संतोष अंभुरे, बी. एम. आकात, संतोष रंजवे, शिवाजी आकात, प्रा. गायकवाड, प्रा. पटेल, प्रा. चामे. प्रा जोशी, प्रा. टेकाळे, प्रा. रिंढे आदींची उपस्थिती होती.