नियमांचे पालन केले, तर अपघात कमी होईल - नितीन पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:29 IST2021-02-13T04:29:26+5:302021-02-13T04:29:26+5:30

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जालना यांच्या वतीने घनसावंगी येथील मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ...

If the rules are followed, accidents will be reduced - Nitin Patil | नियमांचे पालन केले, तर अपघात कमी होईल - नितीन पाटील

नियमांचे पालन केले, तर अपघात कमी होईल - नितीन पाटील

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जालना यांच्या वतीने घनसावंगी येथील मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते.

या प्रसंगी मोटार वाहन निरीक्षक नितीन पाटील, मोटार वाहन निरीक्षक उदय साळुंखे, सहायक मोटार निरीक्षक राधा सोळुंके, सहायक मोटार वाहन निरीक्षक इंगळे, आसाराम घुले, पोलीस कर्मचारी योगेश गायके, प्राचार्य डॉ. विश्वास कदम आदींची उपस्थिती होती.

यावेळी सहायक मोटार वाहन उपनिरीक्षक राधा सोळुंके म्हणाल्या की, युवकांनी प्रवास करताना शिस्तीत वाहने चालवावी. अतिवेगाने किंवा नियमांचे पालन न करता वाहन चालवू नये. हेल्मेटचा वापर सक्तीने करावा. नियमांचे पालन केले, तर रस्त्यावरील अपघात कमी होईल, असेही त्यांनी सांगितले.

मोटार वाहन उपनिरीक्षक इंगळे यांनी रस्त्यावरील चिन्हांचा योग्य वापर करून प्रवास करावा, ओव्हरटेक करताना योग्य काळजी घ्यावी, मोबाइलवर संभाषण करत गाडी चालवू नये, हेल्मेट-बेल्ट-बॅग यांचा वापर करावा, असे त्यांनी आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. कन्नूलाल विटोरे यांनी, तर आभारप्रदर्शन डॉ. ऋषी शिंदे यांनी मानले. यावेळी डॉ. भीमराव पुंडगे, प्रा. ज्ञानेश्वर खोजे, प्रा. खंडू नवखंडे, प्रा. उदय पवार, प्रा. वाल्मीक मेश्राम, प्रा.डॉ. संतोष गायकवाड, प्रा. बाळासाहेब वरखडे, प्रा. भागवत गोरे, दीपक कांबळे, प्रा.डॉ. अनिल तुपकर, डॉ. शरद शुभगडे, डॉ. राठोड, गणेश सुरासे, सतीश ब्राह्मणे, गणेश तारगे आदींची उपस्थिती होती.

अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. विश्वास कदम यांनी केला. ते म्हणाले की, नियमांचे पालन न केल्याने अपघातांमध्ये वाढ होत आहे. नियमांचे पालन करून प्रवास केला, तर वाढते अपघात कमी होऊ शकतात, असेही ते म्हणाले.

Web Title: If the rules are followed, accidents will be reduced - Nitin Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.