Husband dies after wife | पत्नीपाठोपाठ पतीचाही मृत्यू
पत्नीपाठोपाठ पतीचाही मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील घोगरे परिवारातील दोन कर्त्या व्यक्तींचे निधन झाल्याने गवावर शोककळा पसरली आहे.
मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील शिवकन्या घोगरे यांचे चार दिवसांपूर्वी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे दु:ख त्यांचे पती दादाभाऊ सूर्यभान घोगरे (४८) यांना सहन झाले नाही. बुधवारी पहाटे दादाभाऊंना अस्वस्थ वाटू लागल्याने खाजगी दवाखान्यात नेले होते. परंतु, दवाखान्यात नेण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. दादाभाऊ घोगरे यांच्या पश्चात आई, तीन मुले, दोन सुना, एक भाऊ असा परिवार आहे. लोकमतचे घनसावंगी तालुका वार्ताहर तुळशीदास घोगरे यांचे ते बंधू होत. एकाच परिवारातील दोघांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.


Web Title: Husband dies after wife
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.