शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

चाकूचा धाक दाखवून पती-पत्नीस लूटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:57 IST

दोघांविरुध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा जालना : स्वत:च्या धाब्यावर गर्दी जमवून आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांविरुध्द ...

दोघांविरुध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा

जालना : स्वत:च्या धाब्यावर गर्दी जमवून आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांविरुध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दीपक सुसिश मेहरा (३५, जुना जालना), संतोष शेषराव सुरासे (४४, रा. यशोदीपनगर जालना) असे संशयीत आरोपींची नावे आहेत. पुढील तपास सहाय्यक फौजदार कांबळे हे करीत आहेत.

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

जालना : घनसावंगी तालुक्यातील चिंचोली येथील जुगार अड्ड्यावर छापा मारून सात जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई घनसावंगी पोलिसांनी शुक्रवारी केली. मदन तात्या पराडे, अर्जुन बबन लहामगे, मारोती लक्ष्मण खांडे, भिकाजी रधवे, रामनाथ गंगाधर कदम, कैलास बाळू साळवे, राजू दत्तात्रय धोगरे (रा. चिंचोली ता. घनसावंगी) असे संशयीत आरोपींची नावे आहेत. पुढील तपास पोना. राठोड हे करीत आहेत.

अवैध दारूची विक्री करणाºयांवर गुन्हा

जालना : बेकायदेशीररीत्या देशी दारूची विक्री करणाºयास भोकरदन पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. नायबराव भीमराव साळवे (४५, रा. बंरजळा साबळे ता. भोकरदन) असे संशयीत आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ११२० रुपए किमतीच्या १६ देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. पुढील तपास नापोकॉ. जैवाळ यांनी केली.

अवैध दारूची विक्री करणाºयास अटक

जालना : बेकायदेशीररीत्या देशी दारूची विक्री करणाºयास भोकरदन पोलिसांनी बरंजळा लोखंडे येथून ताब्यात घेतले. गजानन शालीकराव जाधव (२९, रा. ताडकळस ता. भोकरदन) असे संशयीत आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ६०० रुपए किमतीच्या १० देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. पुढील तपास नापोकॉ जैवाळ हे करीत आहेत.

शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर

जालना : शिवछत्रपती सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उत्सव समिती कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी रवींद्र राऊत यांची, कार्याध्यक्षपदी सुभाष देवीदान तर सचिवपदी अ‍ॅड. रवींद्र डुरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ज्येष्ठ समाजसेवक अंकुश राऊत यांच्या अध्यक्षतेखाली उत्सव समिती कार्यकारिणी निवडीसाठी गुरुवारी राजमाता गड येथे बैठक घेण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून जेष्ठ नेते विजयकुमार पंडित, गणेश सुपारकर, अशोक पांगारकर, जयंत भोसले, हरेश देवावाले, सुधाकर निकाळजे, तय्यब देशमुख, विमल आगलावे, संध्या देठे, विभावरी ताकट, रेणूका निकम आदींची निवड करण्यात आली.

बायपास रोड वाहतूक कोंडी

जालना : शहरातील अंबड चौफुली ते मंठा चौफुली या रस्त्यावरील कुंडलिका नदीच्या पुलावर मालवाहू ट्रकचे शुक्रवारी रॉड तुटल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. जालना शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या साहाय्याने नादुरुस्त झालेली गाडी हटविली. वाहनांच्या २ कि.मी. पर्यंत लांबच लांब रांगा दिसून आल्या. शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी कर्मचाºयांसह वाहतूक सुरळीत केली.

चला उद्योजक होऊ या मार्गदर्शन वेबिनारचे आयोजन

जालना : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र्र, जालना आणि थिंक शार्प फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चला उद्योजक होऊ या नाविन्यपूर्ण उद्योजकता अभियानातंर्गत प्रत्येक महिन्यात किमान एकदा आॅनलाईन मार्गदर्शन वेबिनार सुरु करण्यात आले आहे. हा कार्यक्रम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र्र, जालना कार्यालयाच्या अधिकृत फेसबुक पेजवर ९ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे.