पतीला रुग्णालयात ॲडमिट करून पत्नी फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:27 IST2021-04-26T04:27:01+5:302021-04-26T04:27:01+5:30

नळणीवाडी येथील एक व्यक्ती आजारी असल्याने त्याच्या १९ वर्षीय पत्नीने शनिवारी दुपारी राजूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले ...

Husband admitted to hospital, wife absconding | पतीला रुग्णालयात ॲडमिट करून पत्नी फरार

पतीला रुग्णालयात ॲडमिट करून पत्नी फरार

नळणीवाडी येथील एक व्यक्ती आजारी असल्याने त्याच्या १९ वर्षीय पत्नीने शनिवारी दुपारी राजूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. त्यांना डॉक्टरांनी तपासून सलाइन लावले. त्यानंतर पत्नीने त्यांना पाणी आणून दिले. त्यानंतर वडिलांचा फोन आला म्हणून पत्नी बोलण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरून खाली गेली. बराच वेळ झाला तरी पत्नी आली नाही, म्हणून पतीने पत्नीला फोन केला. मात्र, कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर पत्नीने मेाबाइल बंद केला. सदर बाब कुटुंबीयांना कळाल्यानंतर शोध घेण्यात आला. परंतु, पत्नी मिळून आली नाही. याप्रकरणी राजूर पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि. संतोष घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी देशमुख हे करीत आहेत.

Web Title: Husband admitted to hospital, wife absconding