पोलीस प्रशिक्षण केंद्रात शंभर जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:35 IST2021-08-17T04:35:46+5:302021-08-17T04:35:46+5:30
कोरोनाकाळात रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा होता. ही बाब लक्षात घेऊन रक्तदान करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. सोमवारी येथील ...

पोलीस प्रशिक्षण केंद्रात शंभर जणांचे रक्तदान
कोरोनाकाळात रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा होता. ही बाब लक्षात घेऊन रक्तदान करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. सोमवारी येथील प्रशिक्षण केंद्रात हे शिबिर पार पडले. शिबिराचे उद्घाटन अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमास
पोलीस निरीक्षक सय्यद, प्रवीणा जाधव, मधुरा भास्कर, आरएसआय यादव, ठाकूर, अलीम, रोटरी क्लबचे अध्यक्ष सागर कावना, सचिव डॉ. अभय सोनी, अभय करवा, सुरेंद्र मुनोत, आशिष सोनी यांची उपस्थिती होती.
दरम्यान, रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा शासकीय रक्तपेढीने सहकार्य केले.
चौकट
प्राचार्य डोंगरे यांनी केले रक्तदान
पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींनी रक्तदानाचे महत्त्व पटवून देत स्वत:देखील या शिबिरात प्रत्यक्ष सहभाग घेतला. यात पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्राचार्य असलेले अभय डोंगरे यांनी स्वत: रक्तदान केले. रक्तदात्यांचा यावेळी प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.